स्पृहा जोशी, एक अशी अभिनेत्री जिनं आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाबरोबर तिनं कविता, लेखन, सूत्रसंचालनातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये ती अविरत काम करत आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत तिनं स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. अशी बहुगुणी अभिनेत्री स्पृहा जोशीने सोशल मीडियावर आईबरोबर गाताना एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री स्पृहा जोशीने हा व्हिडीओ शेअर करत आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “आईला गाण्याची खूप आवड आहे आणि मला तिच्याबरोबर गायला खूप आवडतं. तिचं आवडतं गाणं गातानाची ही एक झलक आहे. हे क्षण अनंत काळापर्यंत जपत राहीन. आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, असं कॅप्शन लिहित स्पृहाने व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: नम्रता संभेरावने मुक्ता बर्वेला वाढदिवसाच्या अशा काही दिल्या शुभेच्छा की अभिनेत्री गेली पळून, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओत स्पृहा जोशी आईबरोबर मोहम्मद रफी आणि आशा भोसलेचं ‘जमीन से हमें आसमान पर’ हे गाणं गाताना दिसत आहे. जेव्हा स्पृहा गायला सुरुवात करते तेव्हा तिची पटी बदलते म्हणून आई तिला बोलते. पण नंतर दोघी एकत्र मिळून सुंदर गाताना पाहायला मिळत आहे. स्पृहा आणि तिच्या आईचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी दोघींचं कौतुक केलं आहे.

प्रसिद्ध संगीतकार, गीतकार सलील कुलकर्णी यांनी व्हिडीओवर “व्वा” अशी प्रतिक्रिया देत कौतुक केलं आहे. याशिवाय उत्कर्ष वानखेडे, शाल्मली सुखटणकर यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘कलर्स मराठी’च्या ‘रमा राघव’ मालिकेनं ४०० भागांचा टप्पा केला पार, कलाकारांनी ‘असं’ केलं सेलिब्रेशन

दरम्यान, स्पृहाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तिची ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘सुख कळले’ मालिका सुरू आहे. या मालिकेत तिनं प्रमुख भूमिका साकारली असून मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘सुख कळले’ मालिकेत स्पृहासह अभिनेता सागर देशमुख, सुनील गोडबोले, बालकलाकार मिमी खडसे, अभिनेत्री स्वाती देवल असे अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत. याशिवाय रंगभूमीवर तिचं ‘स्पृहा व्हाया संकर्षण’ हा कवितेचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. या कार्यक्रमात तिच्या सोबतीला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आहे.