Tejaswini Lonari Baby BoyName: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि तिचे पती, शिवसेना नेते समाधान सरवणकर यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. २२ ऑगस्ट रोजी तेजस्विनीने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर आज, ९ सप्टेंबर रोजी बाळाचा नामकरण सोहळा थाटामाटात आयोजित करण्यात आला. तेजस्विनी आणि समाधान या दोघांच्या नावाप्रमाणेच त्यांनी आपल्या लाडक्या लेकाचे नावदेखील ४ अक्षरी ठेवले आहे. या नावाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. चाहत्यांकडून या नवीन पालकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी व शिवसेना नेते समाधान सरवणकर २२ ऑगस्टला त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. तेजस्विनीने मुलाला जन्म दिला. आता त्यांच्या मुलाचा नामकरण सोहळा पार पडला. तेजस्विनी व समाधान यांच्याप्रमाणेच त्यांच्या मुलाचं नावदेखील चार अक्षरी आहे. तेजस्विनी लोणारी व समाधान सरवणकर यांनी डिसेंबर २०२५ मध्ये लग्न केलं आणि ऑगस्ट २०२६ मध्ये त्यांच्या घरी मुलाचं आगमन झालं. आज ९ सप्टेंबर रोजी त्यांनी मुलाचा नामकरण सोहळा आयोजित केला होता. तेजस्विनी लोणारी व समाधान सरवणकर यांनी मुलाचं नाव ‘समराज’ असं ठेवलं आहे.

Tejaswini Lonari and Samadhan Sarvankar baby boy Samraj naming ceremony
तेजस्विनी लोणारी व समाधान सरवणकर बाळाबरोबर (फोटो- मेगन मेग्स इन्स्टाग्राम)

तेजस्विनीच्या नणंदबाई, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या प्रिया सरवणकर यांनी पोस्ट करून आत्या झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती. त्यानंतर तेजस्विनी व समाधान यांनी आपल्या घरी मुलाचं आगमन झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यांचा मुलगा १९ दिवसांचा झाला असून त्याचं नाव समराज असं ठेवलंय.