अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. वडापाव हे नाव काढलं तरीही तोंडाला पाणी सुटते. सर्वसामान्यांपासून मोठमोठे सेलिब्रेटीही चवीने वडापाव खाताना दिसतात. पण मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मात्र काही वर्षांपूर्वीच वडापाव खाणं सोडून दिलं आहे. नुकतंच तिने याचं कारणही सांगितलं आहे.
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. सध्या ती ‘बांबू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्मिती तिने केली आहे. नुकतंच तेजस्विनीने प्लॅनेट मराठीवरील ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी तिला ‘मला भूक लागलीय आणि मला वडापाव खायचा’ हे वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलायला सांगितलं.
आणखी वाचा : “आम्हा दोघांचे…” संजय जाधवबरोबरच्या नात्याबद्दल तेजस्विनीचं स्पष्ट वक्तव्य
हे वाक्य भावूक होत तिला बोलायला सांगितले असता तेजस्विनी खरोखरचं भावूक झाली. यावेळी तिने मी वडापाव खाणं सोडून दिलं आहे, असा खुलासा यावेळी केला. त्याबरोबरच तिने कारणही सांगितलं.
“मी तुम्हाला खरं सांगू का, तर मी वडापाव खाणं फार वर्षांपूर्वी सोडून दिलं आहे. माझा एक मित्र आहे जो आता या जगात नाही. पण त्याच्यासाठी मी खरंच वडापाव खाणं सोडून दिलं आहे. मला भूक लागलीय, पण मला वडापाव नाही खायचा”, असे ती यावेळी भावूक होत म्हणाली.
दरम्यान तेजस्विनी पंडितने केदार शिंदेच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. काही दिवसांपूर्वी तेजस्विनीने ‘अथांग’ वेबसीरिजची निर्मिती केली आहे. त्यानंतर आता ती ‘बांबू’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.