प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. छोट्या पडद्यापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केलेल्या तेजस्विनीने चित्रपटांतूनही तिच्या दमदार अभिनयाची झलक दाखविली. तेजस्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
तेजस्विनीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेला हा फोटो स्विमिंगपूलमधील आहे. या फोटोमध्ये तेजस्विनी स्विमिंगपूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. या फोटोला तिने “तुमच्यातील शांतता जपा”, असं कॅप्शन तेजस्विनीने या फोटोला दिलं आहे.




हेही वाचा>> ‘आदिपुरुष’ चित्रपटाची १० हजार तिकिटे फ्री देणार! बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्मात्याचा मोठा निर्णय
तेजस्विनीने शेअर केलेला हा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. “बिकिनीतील फोटो कधी टाकणार?” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “खूप मस्त” असं म्हटलं आहे. “सुंदर”, अशी कमेंटही केली आहे. तेजस्विनीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

हेही वाचा>> लग्न, दीड वर्षांची मुलगी आणि घटस्फोट! चारू असोपापासून वेगळं झाल्यानंतर राजीव सेन म्हणाला, “मुलीसाठी…”
दमदार अभिनयाने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या तेजस्विनीने बांबू चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. चित्रपटांबरोबरच तिने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.