वंदना गुप्ते या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी मनोरंजनसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाटक, मालिका, चित्रपट यांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे.

वंदना गुप्ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ पोस्ट करीत त्या चाहत्यांना अपडेट देत असतात. आता वंदन गुप्ते यांची एक नवी पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. नुकताच वंदना गुप्तेंच्या लग्नाचा ५१ वा वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या लग्नातला व सध्याचा, असे दोन फोटो शेअर केले आहेत.

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

हे फोटो शेअर करीत त्यांनी लिहिले, “आमच्या लग्नाच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त. आम्ही इतकी वर्षं एकत्र घालवली यावर विश्वासच बसत नाही. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत शिरीषनं दिलेला पाठिंबा माझ्या यशाचा कणा होता. मनोरंजन उद्योगात ५२ वर्षं. गृहिणी आणि एक अभिनेत्री म्हणून काम करताना प्रत्येकाच्या अपेक्षांची पूर्तता करणं सोपी गोष्ट नाही. सर्व गोष्टींसाठी शिरीष तुझे धन्यवाद.” वंदना गुप्ते यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट्स करीत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वंदना गुप्ते यांनी ५१ वर्षांपूर्वी शिरीष गुप्ते यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. शिरीष व्यवसायाने वकील आहेत. गेल्या वर्षी वंदना व शिरीष यांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त घरातील मंडळींनी या दोघांचे पुन्हा लग्न लावून दिले होते. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

हेही वाचा- “सासू-सासरे येती घरा…” हेमंत ढोमेने शेअर केला पत्नी क्षितीच्या आई-वडिलांबरोबरचा फोटो, म्हणाला….

वंदना गुप्ते यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी अनेक नाटके, मराठी व हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. ‘पछाडलेला’, ‘फॅमिली कट्टा’, ‘फोटोकॉपी’, ’६६ सदाशिव’, ‘डबल सीट’, ‘मातीच्या चुली’, ‘टाइम प्लीज’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘बकेट लिस्ट’, ‘व्हॉट्सअप लग्न’, चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा ‘बाईपण भारी देवा‘ चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती. या चित्रपटात वंदना गुप्ते यांनी साकारलेल्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक करण्यात आले होते.