२०२२ हे वर्षं संपत आलं आहे आणि हे वर्षं एकूणच हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी तितकं खास ठरलेलं नाही. दोन्ही भाषेत बरेच चांगले चित्रपट आले पण तेवढेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशीदेखील ठरले. या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी ‘Galatta Plus’ द्वारे आयोजित गोलमेज संवादात बऱ्याच मोठमोठ्या लोकांनी सहभाग घेतला होता. या मुलाखतीची चर्चादेखील सोशल मीडियावर चांगलीच झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माते अनुराग कश्यप आणि करण जोहर, दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमान आणि कार्थी, केजीएफ स्टार श्रीनिधी शेट्टी, अभिनेत्री पूजा हेगडे, बॉलिवूड अभिनेता वरुण धवन यांनी या मुलाखतीत हजेर लावली. याच दिग्गज मंडळींबरोबर मराठी चित्रपटसृष्टीबद्दल खुलासा करण्यासाठी दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यालाही आमंत्रित करण्यात आलं होतं. या मुलाखतीमध्ये निपुणने मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीतील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.

आणखी वाचा : ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’नंतर ‘या’ पाकिस्तानी वेबसीरिजचा ट्रेलर चर्चेत; सोशल मीडियावर होतोय प्रचंड विरोध

यावर्षी निपुण धर्माधिकारीचा ‘मी वसंतराव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सगळीकडूनच याला उत्तम प्रतिसाद मिळाला. लोकप्रिय शास्त्रीय संगीत गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला लोकांनी उचलून धरलं, तरी म्हणावा तसा या चित्रपटाला प्रतिसाद न मिळाल्याची खंत निपुणने या मुलाखतीमध्ये व्यक्त केली. तसंच हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

निपुण म्हणाला, “मी वसंतराव पूर्ण करण्यासाठी आम्हाला जवळपास ९ वर्षं लागली. त्यादरम्यान आम्ही इतर प्रोजेक्ट केले, पण पैशाचं गणित नीट बसत नसल्याने हा चित्रपट बनवायला वेळ लागला. तोवर मी कोणताही चित्रपट केला नाही, राहुल देशपांडेनेही कोणताही चित्रपट केला नाही. तेव्हा कुणीच आमच्यावर विश्वास टाकला नाही. आता विचार करतो तेव्हा ही रक्कम छोटी वाटते, पण तेव्हा केवळ ४ कोटी कमी पडत असल्याने आम्हाला तो चित्रपट पूर्ण करायला वेळ लागला. अर्थात आम्ही यातूनही मार्ग काढत चित्रपट केला आणि लोकांना तो पसंत पडला.” निपुणने याआधी ‘बापजन्म’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय तो ‘इश्क विश्क रीबाउंड’ या आगामी हिंदी चित्रपटाचंसुद्धा दिग्दर्शन करणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi film director nipun dharmadhikari says it took 9 years to make me vasantrao avn
First published on: 10-12-2022 at 10:16 IST