Marathi Filmfare Awards 2026 Winners List Marathi News: ११ वा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा ६ ऑगस्ट रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. अमेय वाघ व सिद्धार्थ चांदेकर हे या सोहळ्याचे होस्ट होते. या सोहळ्यात ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला, तर ‘दशावतार’ मधील उत्कृष्ट अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय, सिद्धार्थ जाधवला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘साबर बोंड’ आणि ‘स्थळ’ या चित्रपटांनी क्रिटिक्स विभागात वर्चस्व गाजवले. या सोहळ्यातील विजेत्यांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे आहे.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला अमृता फडणवीस, अनन्या पांडे, वर्षा उसगांवकर, छाया कदम, सचिन पिळगांवकर, भरत जाधव, श्रिया पिळगांवकर, प्रिया बापट, नेहा पेंडसेसह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.

फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट – आता थांबायचं नाय


सर्वोत्कृष्ट अभिनेते – दिलीप प्रभावळकर (दशावतार)


सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) – साबर बोंड


सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) – स्थळ


सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) – भुषण मनोज (साबर बोंड)


सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) – तारानाथ खिरतकर (स्थळ)


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) – नंदिनी चिकटे (स्थळ)


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सिद्धार्थ जाधव (आता थांबायचं नाय)


फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार – राजदत्त


बेस्ट मेल डेब्यू – निशाद भोईर (गोंधळ)


बेस्ट मेल डेब्यू – कुणाल शुक्ला (पाण्याचा घोडा)


बेस्ट फिमेल डेब्यू – साजिरी जोशी (एप्रिल मे ९९)
बेस्ट फिमेल डेब्यू – इशिता देशमुख (गोंधळ)


सर्वोत्कृष्ट बालकलाकार – क्रिश मोरे (खालिद का शिवाजी)


बेस्ट म्युझिक अल्बम – गुलराज सिंग आणि सौरभ भालेराव (आता थांबायचं नाय)

सर्वोत्कृष्ट गीतकार – मनोज यादव (आता थांबायचं नाय शीर्षक गीत)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावले (आता थांबायचं नाय शीर्षक गीत)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – निहिरा जोशी देशपांडे (चल रे मना जाऊ, आता थांबायचं नाय)

सर्वोत्कृष्ट संवाद – शिवराज वायचळ, ओंकार गोखले आणि अरविंद जगताप (आता थांबायचं नाय)

सर्वोत्कृष्ट पटकथा – संतोष डावखर (गोंधळ)

सर्वोत्कृष्ट कथा – जयंत दिगंबर सोमलकर (स्थळ)

सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- अमलेंदु चौधरी (गोंधळ)

बेस्ट साउंड डिझाईन – जयेश ढाकन (गोंधळ)

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी – स्टॅनली डी’कोस्टा (टाकुंबा गाणं, एप्रिल मे ९९)

सर्वोत्कृष्ट मेकअप – रोहित महाडिक (दशावतार)

सर्वोत्कृष्ट एडिटिंग – अभिजीत देशपांडे (स्थळ)

बेस्ट कॉस्च्युम डिझाईन – सचिन लोवलेकर (दशावतार)

बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन – संजीव राणे (दशावतार)