Marathi Natak : छोट्या पडद्यावरील बरेच कलाकार अलीकडच्या काळात विविध माध्यमांवर झळकत आहेत. अशातच आता मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच एका नाटकाद्वारे पुनरागमन करणार आहे. ही अभिनेत्री कोण आहे जाणून घेऊयात… 'अ परफेक्ट मर्डर’ या नाटकासाठी या अभिनेत्रीने खास खाकी वर्दी चढवली आहे. रहस्यांचा बादशहा आल्फ्रेड हिचकॉक याच्या एका मर्डर मिस्ट्रीचे मराठीत रूपांतर करत लेखक निरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचा उत्तम पट रंगमंचावर मांडला आहे. घटना-प्रसंगांतून निर्माण केलेले गूढ उकलताना केली जाणारी रहस्य आणि त्याची कल्पक मांडणी हे या नाटकाचं वैशिष्टय असून लवकरच या नाटकात अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे खाकी वर्दीत दिसणार आहे. आपल्या उत्तम अभिनयाने डॉ. श्वेता पेंडसे हिने अनेक भूमिका सशक्तपणे पेलल्या आहेत. तिच्या येण्याने नाटकाला कलाटणी मिळणार आहे. बदामराजा प्रॉडक्शन्स संस्थेच्या या नाटकाचे निर्माते माधुरी गवांदे, निनाद कर्पे आहेत. हेही वाचा : Video : “लपून छपून तुमचा खेळ…”, रितेश देशमुखने निक्कीनंतर पंढरीनाथला झापलं, नेटकरी म्हणाले, “भाऊ कडक…” गेली अनेक वर्ष नाट्यरसिकांचं मनोरंजन करीत या नाटकाने आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. खून लपवण्याचा आणि खुनामागचं खरं रहस्य उलगडण्याचा खेळ म्हणजे ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक ( Marathi Natak ). अनेक नावाजलेल्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. नाटकाला वेगळा ट्विस्ट देण्यासाठी अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे लेडी इन्स्पेक्टर म्हणून समोर येणार आहे. या वेगळ्या भूमिकेद्वारे ती या नाटकात पुनरागमन करते आहे. नाटकाबद्दल काय म्हणाली श्वेता पेंडसे? "खूप कमी सस्पेन्स नाटकं मनाचा ठाव घेतात, नाट्यरसिकांना गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करत नाटाकाची रंजकता वाढावी लागते. श्वेताच्या येण्याने नाटकाला काय कलाटणी मिळणार? ती खुनाचा कट ‘परफेक्ट’ उलगडू शकेल का? हे पाहणं नाट्यरसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. ‘सस्पेन्स थ्रीलर’ नाटक ( Marathi Natak )म्हटलं की कथेसोबत कलाकारांच्या अभिनयाचा कस असतो. माझ्यासाठी ही भूमिका तितकीच चॅलेंजिंग आहे" असं डॉ. श्वेता सांगते. हेही वाचा : Video : मुग्धा वैशंपायनच्या सासुरवाडीत भक्तीमय वातावरण; प्रथमेशसह गायलं भजन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली… मराठी नाटकात पुनरागमन ( Marathi Natak ) नाटकाचा हा ३४५ प्रयोग असून ऑपेरा हाऊसमधील ५ व्या प्रयोगाचे प्रस्तुतकर्ते आयएनटी आदित्य बिर्ला सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस हे आहेत. ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचे ( Marathi Natak ) लेखन आणि नेपथ्य नीरज शिरवईकर यांचं आहे. संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.