scorecardresearch

आर्या आंबेकरला झाला घशाचा संसर्ग, स्वत: दिली माहिती, म्हणाली “मी माझे…”

तिने रेकॉर्डिंग स्टुडिओतील काही फोटो शेअर केले आहेत.

aarya ambekar
आर्या आंबेकर

आपल्या गोड आवाजाने कानसेनांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे आर्या आंबेकर ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. गायन क्षेत्राप्रमाणेच आर्याने अभिनय क्षेत्रातदेखील तिचं नशीब आजमावलं आहे. आर्या आंबेकरचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो. आर्या आंबेकरला नुकतंच घशाचा संसर्ग झाला आहे. तिने स्वत: पोस्ट करत याबद्दल सांगितले आहे.

आर्या आंबेकर ही झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शो मुळे प्रसिद्धीझोतात आली. आर्या आंबेकर ही आज अनेकांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. आर्याने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने रेकॉर्डिंग स्टुडिओतील काही फोटो शेअर केले आहेत.
आणखी वाचा : “कार्तिकी गायकवाडमुळेच…” मुलाखतीदरम्यान आर्या आंबेकर स्पष्टच बोलली

“मी आज ‘संगीत उत्तर रामायण’ या म्युझिक अल्बमसाठी तीन गाण्यांचे रेकॉर्डिंग केले. अशोक जोशी यांनी ती गाणी सुंदरपणे लिहिली आहेत आणि केदार पंडित काका यांनी ती संगीतबद्ध केली आहेत.

जरा अलीकडेच मी घशाचा संसर्गाने त्रस्त आहे. पण या गाण्याच्या रचनेमुळे मी मनापासून ते गाणं गाऊ शकले. मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला आहे”, असे आर्या आंबेकरने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “तेव्हा तुमचे संस्कार…” मेघा घाडगेची संतप्त पोस्ट चर्चेत

दरम्यान आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील अल्बम्समध्ये गाणी गायली आहे. त्याबरोबर तिने काही मराठी चित्रपटांसाठी आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गोड गळ्यासोबत आर्याच्या सौंदर्याने देखील अनेकांना भुरळ घातली आहे. २०१७ सालामध्ये आलेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 10:05 IST
ताज्या बातम्या