scorecardresearch

Premium

महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित केलेल्या नदीचा व्हिडीओ शरद पोंक्षेंनी केला शेअर; म्हणाले, “जगातली…”

अभिनेते शरद पोंक्षेंच्या ‘या’ व्हिडीओवरील नेटकऱ्यांची प्रतिक्रिया वाचा…

marathi actor Sharad Ponkshe
अभिनेते शरद पोंक्षेंच्या 'या' व्हिडीओवरील नेटकऱ्यांची प्रतिक्रिया वाचा..

मराठी सिनेसृष्टीत आपल्या परखड विचारांमुळे चर्चेत असणारे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रांत आपल्या दमदार अभिनयानं त्यांनी एक वेगळी छाप उमटवली आहे. या व्यतिरिक्त ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्व याविषयी व्याख्यानंदेखील देत असतात. लवकरच त्यांचं ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या’ भेटीस येणार आहे. या नाटकाचे फक्त ५० प्रयोग होणार आहेत. यादरम्यान, शरद पोंक्षेंनी सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.

हेही वाचा – “देवाने स्वर्गातून पृथ्वीवर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुलेंनी सोनाली कुलकर्णींचे का मानले आभार?

loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : पक्षविस्तार नव्हे पक्षबुडीचा संकेत
former president jair bolsonaro marathi news, jair bolsonaro latest news in marathi, brazil latest news in marathi
विश्लेषण : ब्राझीलचे माजी अध्यक्ष ‘ट्रम्पभक्त’ जाइर बोल्सोनारो पुन्हा अडचणीत? वर्षभरापूर्वी केलेला बंडाचा प्रयत्न किती भोवणार?
Amruta Fadnavis on devendra Fadnavis
“निखिल वागळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा…”, कायदा-सुव्यवस्थेवरून अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
The black paper released by the Congress on Thursday criticized the bjp
१० वर्षांत ४११ आमदारांची फोडाफोडी; काँग्रेसच्या काळय़ापत्रिकेत भाजपवर टीकास्त्र

अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकताच महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित केलेल्या नदीचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, “जगातली सर्वांत लांब नदी ‘नाईल नदी’ युगांडा ते इजिप्त ६८४० किमी एवढी वाहते. त्याचा हा उगम. तिथेच म. गांधींच्या अस्थी विसर्जित केल्या आहेत. ते पाहण्याचा योग आला.”

हेही वाचा – Bigg Boss 17: अंकिता लोखंडे पतीसह यंदाच्या बिग बॉसमध्ये प्रवेश करण्यास सज्ज; खरेदी केले २०० कपडे अन् ‘हा’ प्लॅन…

शरद पोंक्षेंनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “नदीला संपवायच्या भानगडीत पडू नका”, “मनातील नथुराम गोडसे जागे झाले असतील”, “साहेब अगदी खरं सांगा, तिथे गेल्यावर तुमच्या मनात काय विचार आला? आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल”, “महात्मा गांधी असं नाव लिहायला लाज वाटते का? गोडसेचे दत्तक पुत्र” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी शरद पोंक्षेंनी शेअर केलेल्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: शाहरुख खानच्या ‘चलेया’ गाण्यावर अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, शरद पोंक्षे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर सध्या ते ‘झी मराठी’वरील ‘दार उघड बये’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या दररोज भेटीस येत आहेत. तसेच ते लवकरच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात ते डॉ. हेडगेवार यांच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi sharad ponkshe share new video goes viral on social media pps

First published on: 27-09-2023 at 11:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×