केतकी माटेगावकर, जिनं बालपणापासून आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. त्यानंतर केतकीनं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. बऱ्याच मराठी चित्रपट, जाहिरातीमध्ये ती झळकली. आता केतकीचा ‘अंकुश’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याचं चित्रपटाचं सध्या केतकी प्रमोशन करताना दिसतं आहे.

केतकीच्या या नव्या चित्रपटात दीपराज, सयाजी शिंदे, मंगेश देसाई, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, पूजा नायक अशी जबरदस्त कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. ओमकार फिल्म क्रिएशन्स निर्मिती संस्थेच्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिली निर्मिती असलेला ‘अंकुश’ हा बिगबजेट चित्रपट आहे. याच बिगबजेट चित्रपटात केतकी झळकणार आहे. अशातच केतकीनं तिच्या मजेशीर टोपण नावांचा खुलासा केला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – कोकणची शान नेहा पाटीलला मिळाला लावणी सम्राज्ञीचा मान; ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती

हेही वाचा – Video: सागर कारंडे बऱ्याच काळानंतर दिसला पोस्टमनच्या भूमिकेत, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर घेऊन आला सुरेश वाडकरांसाठी पत्र

‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलच्या रॅपिड फायर सेगमेंटमध्ये केतकी माटेगावकर सहभागी झाली होती. यावेळी तिला विचारलं गेलं की, “तुझी टोपण नाव काय आहेत?” यावर केतकी म्हणाली की, “मित्र-मैत्रिणी मला किकी (KIKI) म्हणतात. आई-बाबा काय म्हणतात हे सांगता येणार नाही. पण आई मला मनी म्हणते.”

हेही वाचा – “मी लग्न केलं…” केतकी माटेगावकरचा खुलासा, म्हणाली, “माझा पहिला नवरा…”

दरम्यान, केतकी ‘मीरा’ या चित्रपटात देखील झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाले होते. याची माहिती तिनं स्वतः फोटो शेअर करून दिली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता प्रसाद ओकही जोडीला असणार आहे. पण अजूनपर्यंत हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याची माहिती समोर आलेली नाही.

Story img Loader