scorecardresearch

“‘कान्हा’ चित्रपटाच्यावेळी वैभव तत्त्ववादी…” अवधूत गुप्तेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अवधूत गुप्तेच्या ‘त्या’ पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

avadhoot gupte vaibhav tatwawadi
अवधूत गुप्ते वैभव तत्त्ववादी

गेल्या काही दिवसांपासून ऋता दुर्गुळे आणि वैभव तत्त्ववादीच्या ‘सर्किट’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सर्किट’ चित्रपटाची चांगली चर्चा रंगली होती. या ट्रेलरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आणि रोमान्स पाहायला मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेने एक पोस्ट शेअर केली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून अवधूत गुप्तेला ओळखले जाते. त्याच्या गाण्यामुळे त्याने सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अवधूत गुप्ते हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. नुकतंच अवधूत गुप्तेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : Video : हाय व्होल्टेज ड्रामा आणि ऋता-वैभवचा रोमान्स, बहुचर्चित ‘सर्किट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अवधूत गुप्तेची पोस्ट

“पार्श्वगायक हा सुद्धा पडद्या पाठीमागे शेवटी अभिनयच करत असतो. अभिनेत्यासारखी त्याला देखील भूक असते वेगवेगळ्या भूमिका वठवायची. अशा वेगळ्याच गाण्यातून अशी वेगळीच भूमिका वठवायची संधी मला दिली आहे माझा लाडका मित्र संगीतकार अभिजीत कवठाळकर ह्याने. आगामी ‘सर्किट‘ ह्या चित्रपटाचा ट्रेलर आणि इतर गण्यातून दिसणारी दृश्य बघून संपूर्ण महाराष्ट्रा इतकीच मला देखील उत्सुकता लागली आहे की, कधी एकदा चित्रपट प्रदर्शित होतो आणि कधी एकदा मी जाऊन तो सिनेमागृहामध्ये पाहतो!

आमच्या ‘कान्हा‘ चित्रपटावेळच्या वैभवची आणि आता ‘सर्किट‘ मधल्या वैभवाची शरीरयष्टी, ह्यातील फरक केवळ थक्क करून सोडतो! So proud of you Vaibhav!! ह्या सर्व गोष्टी इतक्या कौशल्याने घडवून आणल्याबद्दल दिग्दर्शक आकाश पेंढारकरांचं खूप कौतुक, चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि मला ह्या चित्रपटाचा भाग करून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद!” अशी पोस्ट अवधूत गुप्तेने म्हटली आहे.

आणखी वाचा : “मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला

“सर्किट” या चित्रपटात वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहेत. त्याबरोबर अभिनेते मिलिंद शिंदे यात झळकताना पाहायला मिळत आहेत. येत्या ७ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन केले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 16:59 IST

संबंधित बातम्या