मराठी सिनेसृष्टीत असे अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले; ज्यांच्या जाण्याचे एक पोकळी निर्माण झाली. त्यापैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेते विजय चव्हाण. मराठी सिनेसृष्टी, रंगभूमी गाजवणारे विजय चव्हाण यांची जागा आज कोणीही भरून काढू शकत नाही आणि त्यांच्या अभिनयाला तोड नाही. विजय चव्हाणांचं नाव घेतलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती म्हणजे ‘मारूची मावशी’ या गाजलेल्या नाटकातील मावशी. टांग टिंग टिंगाक् म्हणत आपल्या तालावर नाचवणारे ही मावशी मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात कायम राहिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडेच विजय चव्हाण यांच्या पत्नी विभावरी जोशी-चव्हाण व मुलगा वरद चव्हाण हे अभिनेत्री सुलेखा तळवलकरांच्या युट्यूब चॅनलवरील स्मृतिचित्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी विभावरी जोशी-चव्हाण यांनी विजय चव्हाण यांच्याशी झालेली ओळख, त्यानंतर प्रपोज कसं केलं? याविषयी सांगितलं.

हेही वाचा – टीआरपीच्या शर्यतीत ‘घरोघरी मातीच्या चुली’ व ‘साधी माणसं’ या नवीन मालिका कोणत्या स्थानावर? जाणून घ्या टॉप-१० मालिका

‘अशी’ झाली ओळख

विभावरी जोशी-चव्हाण म्हणाल्या, “विजय यांची ओळख माझ्याशी आधी अभिनेता म्हणूनच झाली. त्यावेळेला त्यांची नाटकं जोरदार सुरू होती. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल सगळं माहित होतं. समोर एकत्र काम करायची वेळ ‘मोरूची मावशी’ या नाटकात आली. सुरुवातीला नाटकातल्या सगळ्यांच्या भूमिका निश्चित झाल्या होत्या. मी एकटी सर्वात शेवट आली होती. त्यामुळे माझं एवढं त्यांच्याशी जुळलं पण नव्हतं. आम्ही कधी बोलायचो पण नाही. प्रशांत पटवर्धन आणि ज्या दोन मुली होत्या यांच्याबरोबर आमचं-आमचं चालायचं आणि निर्माते, दिग्दर्शक एकत्र असायचे. दिलीप कोल्हटकर हे माझ्या खूप जवळचे होते. मी दिलीप कोल्हटकर यांचं एक नाटक केलं होतं. त्यामुळे ‘मोरूची मावशी’ नाटकातच विजय यांच्याशी अभिनेता म्हणून ओळख झाली. मला तेव्हा प्रश्न पडला होता की, अरे विजय चव्हाण काम करतात ठीक आहे. पण स्त्रीची भूमिका कशी काय करणार? एवढा दणदणीत, वेगळं व्यक्तिमत्त्व असलेला माणूस कशी काय स्त्रीची भूमिका करणार? पण ते सगळं काही विजय यांनी पुसरलं. नंतर ते अख्ख्या महाराष्ट्राचे ताईत झाले. एकही पेपर, मॅगजीन काहीच शिल्लक नव्हती अगदी इंग्लिश, गुजरातीमध्ये ‘मोरूची मावशी’ नाटक धुमशान घालतं होतं.

फोटो सौजन्य – वरद चव्हाण इन्स्टाग्राम

पुढे विजय चव्हाणांच्या पत्नी म्हणाल्या, “आमची अशी खास मैत्री झाली नाही. कारण विजय मला खूप मॅच्युअर वाटायचे. मी मगाशी म्हटलं तसं प्रशांत पटवर्धन हे माझ्या वयोगटातील असल्यामुळे मी त्याच्याबरोबर जास्त असायची. नंतर मग एक-एक गोष्टी कळायला लागल्या. नाटकाचे बाहेर शो असायचे. तेव्हा तिथे खूप वाईट व्यवस्था केल्या जात होत्या. पण तिथे गेल्यावर आधी विजय हे संपूर्ण मेकअप रुमची पाहणी करायचे. कुठे होल आहे का? आपल्या मुली कपडे बदलणार आहेत, हा जो विजय यांचा स्वभाव होता ना. ते पाहून वाटायला लागलं, हा माणूस खूपच चांगला आहे. ‘मारूच्या मावशी’मध्ये असताना विजय खांद्यावर हात पोकळ ठेवायचे. मी म्हटलं हे काय? असं कधी असू शकत का? नाटकाचा माणूस तुम्ही आहात, नीट हात ठेवना. पण नाही. विजय यांनी आमचं लग्न होईपर्यंत खांद्यावर पोकळ हात ठेवायचे. मग यानंतर त्यांच्याविषयी माझी मतं सकारात्मक होऊ लागली. हा माणूस खूप ग्रेट आहे, असं वाटू लागलं.”

विजय चव्हाण यांनी केलं प्रपोज

विभावरी म्हणाल्या, “विजय यांचा वाढदिवस होता आणि आमचा डोंबिवलीला शो होता. तर त्यादिवशी विजय यांनी मला सांगितलं, तुझा फोन नंबर दे. तर तेव्हा लँडलाइन होते. मोबाइल वगैरे नव्हते. मी म्हटलं तुम्हाला कशाला माझा नंबर पाहिजे? कारण मला असं झालं, हा माणूस माझा नंबर का मागतोय? प्रशांत पटवर्धनला मी अरे तुरे करायचे. विजय यांनी मी अहो जाओ म्हणायचे. एवढं आमच्यात अंतर होतं. नंतर मला विजय म्हणाले, ‘मी ठरवलेलं तू जर आज मला नंबर नाही दिला तर मग विचारायचं नाही.’ म्हणजे माझा विश्वास पाहण्यासाठी. नंबर दिला तरच आपण पुढे जायचं. मी तेव्हा नंबर देणार नव्हते. पण म्हटलं, ठीक आहे. कामासाठी नंबर मागत असतील. त्यामुळे मी त्यांना नंबर दिला. मग त्याच्यानंतर काही दिवसांनी मला विचारलं. मला जरा एक-दोन दिवस पाहिजे, असं कसं लगेच हो म्हणणार, असं मी कळवलं. कारण मी विभावरी जोशी, मी शाकाहारी अजिबात जेवायची नाही. विजय तेव्हा चाळीत राहायचे. आमचं स्वतःचं कोलारु घर होतं. कुठेच आमचा एकत्र मेळ बसत नव्हता.

हेही वाचा – ‘फुलाला सुगंध मातीचा’मधील कीर्ती-शुभम पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस! निमित्त आहे खास

“‘मारूची मावशी’ नाटकाचे निर्माते सुधीर भट विजय यांना म्हणाले, ‘अरे विजय काय करतोय? विभाला कुठे विचारतो? ती तर शाकाहारी जेवणापासून लांब पळते. तुला सारखं शाकाहारी जेवण पाहिजे. तुमचं कसं जमणार?’ विजय म्हणाले, ‘बघू घेईन, काय होईल ते.’ काही काळानंतर मी विजय यांना होकार दिला. पण अजूनपर्यंत माहित नाही मी विजय यांना का हो म्हटलं. आजही कळलं नाही. कदाचित मला त्यांच्यातला माणूस जास्त भावला असेल. म्हणून मी तेव्हा होकार दिला. यावेळेस मी २६, २७ वर्षांची होते. तर विजय ३० वर्षांचा होता,” असं विभावरी जोशी-चव्हाण म्हणाले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi veteran actor vijay chawan and vibhavari chawan love story pps