भारतीय रसिकांमध्ये क्रिकेटचे वेड काहीही केलं तरी कमी होत नाही. चाहते हे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूसाठी काय करतील याचा काही नेम नाही. त्यातही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची गोष्ट काही औरच… सचिनसाठी चाहते निरनिराळ्या मार्गाने त्यांच्याबद्दलच आपलं प्रेम व्यक्त करत असतात. सचिनप्रती असलेल्या प्रेमापोटी एका चाहत्याने थेट चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘तेंडल्या’ असे या चित्रपटाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सध्या त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

‘अश्वमेध मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘तेंडल्या’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात गावातील काही मुलांच्या क्रिकेट खेळण्याने होते. ही मुलं गावातील शेतात क्रिकेट खेळत असतात. त्यानंतर एक मुलगा हा गोलंदाजी करताना दाखवलं आहे. त्यानंतर ही सर्व क्रिकेट खेळणारी मुले जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. या चित्रपटाची कथा ही खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांचं सचिन तेंडुलकरवर असणारं प्रेम आणि क्रिकेट यावर अवलंबून आहे, अशी माहिती क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी दिली.
आणखी वाचा : “माझे जाडेपण…” वजनावरुन खिल्ली उडवणाऱ्यांना विशाखा सुभेदारने दिलेले सडेतोड उत्तर

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

या चित्रपटाला पाच राज्य आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाची निर्मिती करोना काळापूर्वी झाली होती. २४ एप्रिल २०२० रोजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडलं.

‘तेंडल्या’ हा चित्रपट सचिन तेंडुलकरनेही पाहिला असल्याची माहिती सुनंदन लेले यांनी दिली. “सचिनने हा चित्रपट पाहिला. त्याला हा चित्रपट प्रचंड आवडला. त्यानेही या चित्रपटाचे आणि कलाकारांचे कौतुक केले आहे”, असे ते म्हणाले.

दरम्यान या चित्रपटात झळकणारे कलाकार शूटिंगच्या वेळी ११ वी आणि १२ वी पर्यंत शिक्षण घेत होते. यात ओंकार गायकवाड, स्वप्नील पाडळकर, राज कोळी, हर्षद केसरे, महेश जाधव, आकाश तिकोटी हे कलाकार दिसणार आहे. येत्या ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.