scorecardresearch

‘मी वसंतराव’सुद्धा ऑस्कर २०२३ च्या शर्यतीत; राहुल देशपांडे यांनी पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

चित्रपटात राहुल देशपांडे यांनी त्यांचे आजोबा वसंतराव देशपांडे यांची भूमिका निभावली आहे

‘मी वसंतराव’सुद्धा ऑस्कर २०२३ च्या शर्यतीत; राहुल देशपांडे यांनी पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी तसा निराशाजनकच होता. भारतीय प्रेक्षकांना ज्या चित्रपटाची अपेक्षा होती त्याऐवजी ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाची निवड झाल्याने बरीच लोक निराश होती. आता मात्र २०२३ मध्ये ऑस्कर सोहळ्यात भारतीय चित्रपट नक्कीच झेंडे रोवणार असं चित्र सध्या दिसत आहेत.

एक दोन नव्हे तर तब्बल ५ चित्रपट २०२३ च्या ऑस्करसाठी शॉर्टलीस्ट झाले आहेत. विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’, ‘कांतारा’, ‘आरआरआर’, ‘गंगूबाई काठीयावाडी’ आणि ‘छेल्लो शो’ हे ५ चित्रपट शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. अकादमी पुरस्कारांच्या अधिकृत वेबसाईटवर या चित्रपटांची आणि निवड झालेल्या कलाकारांची नावं ऑस्कर २०२३ च्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘कांतारा’ पाठोपाठ ‘या’ ३ चित्रपटांचीही ऑस्कर २०२३ मध्ये एंट्री

विशेष गोष्ट म्हणजे शॉर्टलिस्ट झालेल्या ३०१ चित्रपटांच्या यादीत निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटाचाही समावेश आहे. राहुल देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून या यादीचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच अभिनेते आणि अभिनेत्रींच्या यादीत राहुल देशपांडे, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, अनीता दाते यांच्याही नावाचा समावेश आहे.

या चित्रपटात राहुल देशपांडे यांनी त्यांचे आजोबा वसंतराव देशपांडे यांची भूमिका निभावली आहे. शास्त्रीय संगीताची साधना करणाऱ्या एका दिग्गज गायकाच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट चांगलाच गाजला. ‘श्वास’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, आणि ‘कोर्ट’ सारख्या चित्रपटानंतर ऑस्करसाठी अशा मराठी चित्रपटाचे नाव पुढे येणं मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 16:55 IST

संबंधित बातम्या