scorecardresearch

“वाळवी हा चित्रपट…” मनसे नेते अमेय खोपकरांचे ट्वीट

आता या चित्रपटाबद्दल राजकीय नेतेमंडळीही भाष्य करताना दिसत आहे.

“वाळवी हा चित्रपट…” मनसे नेते अमेय खोपकरांचे ट्वीट
अमेय खोपकर वाळवी

दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा ‘वाळवी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेता स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर आणि गाणी चांगलीच हिट होताना दिसत आहे. अनेक कलाकारांनी हा चित्रपट कसा वाटला याबद्दल त्यांचे परीक्षण नोंदवले आहे. आता या चित्रपटाबद्दल राजकीय नेतेमंडळीही भाष्य करताना दिसत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर हे कायमच विविध चित्रपटांबद्दल भाष्य करताना दिसतात. ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकतंच अमेय खोपकर यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी त्यांना वाळवी हा चित्रपट कसा वाटला? याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : Vaalvi Movie review : मराठी प्रेक्षकांचं डोकं पोखरणारा स्वप्नील-सुबोधचा ‘वाळवी’ पाहायलाच हवा, कारण…

“वाळवी’ हा चित्रपट प्रत्येक चित्रपटरसिकाने आवर्जून पहावा असा आहे. इतका उत्कंठावर्धक चित्रपट आजवर मराठीत झालाच नाही. लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा प्रत्येक बाबतीत या चित्रपटाने अव्वल कामगिरी केलेली आहे. परेश मोकाशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन”, असे अमेय खोपकर यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : वाळवी चित्रपट कसा वाटला? प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला “मी कितीही वेळा…”

दरम्यान झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी’ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. यात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे हे कलाकार झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच हिट ठरताना दिसत आहे. यात हे कलाकार एका वेगळ्याच अंदाजात दिसत असून त्यांच्या व्यक्तिरेखा चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढवणाऱ्या आहेत. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 19:03 IST

संबंधित बातम्या