सध्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ सीरिजची जोरदार चर्चा चालू आहे. फेसबुक असो किंवा इन्स्टाग्राम रील्स सर्वत्र ‘हीरामंडी’ सीरिजचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याशिवाय यामधील काही गाणी सुद्धा प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झाली आहे. अगदी मराठी कलाकारांना सुद्धा या सीरिजची आणि यामधील ट्रेंड होणाऱ्या गाण्यांची भुरळ पडली आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी काही दिवसांपूर्वीच ‘हीरामंडी’ सीरिजमधली लोकप्रिय गाण्यावर एक व्हिडीओ शेअर केला होता. आता मराठी कलाविश्वातील बहिणींची लोकप्रिय जोडी अर्थात सर्वांच्या लाडक्या देशपांडे सिस्टर्सनी या गाण्यावर खास व्हिडीओ शेअर केला आहे. मृण्मयी आणि गौतमी या दोन्ही बहिणी यामध्ये फारच सुंदर दिसत आहेत.

हेही वाचा : लाडक्या आईसाठी परदेशातून आली मुलं; माधुरी दीक्षितने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! डॉ. नेनेंनी शेअर केला Inside व्हिडीओ

मृण्मयी देशपांडेने फिकट पिवळ्या रंगाची साडी, त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज, साडीवर शोभणारे कानातले, केसात गुलाबाची फुलं असा सुंदर लूक केला आहे. तर, गौतमीने या व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाचा चिकनकारी ड्रेस परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. या नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या लूकमध्ये दोघी बहिणी अतिशय सुंदर दिसत आहेत. तसेच या व्हिडीओला गौतमीने दिलेल्या हटके कॅप्शनने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित ‘या’ महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीस, ‘मिर्झापूर ३’ वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाणून घ्या

गौतमीने या व्हिडीओला ‘हीरामंडी’ सीरिजचं “एक बार देख लिजिए…” हे गाणं लावलं आहे. तसेच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री लिहिते, “हे गाणं ट्रेडिंग असल्यामुळे आमच्या ताईजानबरोबर खास व्हिडीओ शेअर केला” या व्हिडीओवर सर्वच नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय मृण्मयीच्या काही चाहत्यांनी तिने देखील ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये भूमिका साकारायला हवी होती अशी इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “क्रिकेट काय शिकवतं?”, RCB च्या मॅचनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; कोहलीबद्दल म्हणाला…

दरम्यान, ‘हीरामंडी’ सीरिजबद्दल सांगायचं झालं, तर १ मे रोजी ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली. याचं दिग्दर्शन बॉलीवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. यामध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, शर्मिन सेगल, रिचा चड्ढा, संजीदा शेख, फरीदा जलाल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सध्या सीरिजचं सगळेच कलाकार कौतुक करत आहेत.