Mrunmayee Deshpande shared a special photos: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे काही दिवसांपूर्वी तू बोल ना या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. इतकेच नाही तर या चित्रपटाचे तिने दिग्दर्शनही केले होते.
अभिनेत्रीने याआधी विविध मालिका आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने काही रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालनदेखील केले आहे. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठा आहे. मृण्मयी अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते.
मृण्मयी देशपांडेच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण
नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नवऱ्याबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत. तिच्या पतीचे नाव सौरभ राव असे आहे. मृण्मयी आणि सौरभच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने मृण्मयीने खास फोटो शेअर केले आहेत.
विविध ठिकाणचे हे फोटो आहेत. काही कार्यक्रमातील, काही त्यांच्या शेतातील, काही घरातील फोटो आहेत. या फोटोंमध्ये ते अत्यंत छान दिसत आहेत. एक फोटो त्यांच्या लग्नातील आहे.
हे सुंदर फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, “९! हॅपी अॅनिव्हर्सरी राव.” पुढे तिने नवऱ्याला टॅग करत लिहिले, “या पोस्टमध्ये मी तुला कोलॅबरेटर(collaborator) म्हणून तुला अॅड करणार नाही. तुझी पोस्ट तू कर.”
नेटकरी म्हणाले…
आता मृण्मयीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सलील कुलकर्णी व कुशल बद्रिके यांनी हार्ट इमोजी शेअर केली आहे. एकाने लिहिले, “कॅप्शन आवडली आहे. हॅपी अॅनीव्हर्सरी”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “तुमच्याबरोबर आयुष्यभरासाठी कोलॅब्रेशनकेल्यानंतर त्यांना आता शेतातील पीकाबरोबर कोलॅब्रेशन करणं महत्वाचं वाटतं असेल. विनोद बाजूला पण तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”



एकाने लिहिले, “हॅपी अॅनिव्हर्सरी”, तर अनेकांनी कॅप्शन असे लिहित हसण्याच्या इमोजी शेअर केल्या. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. मृण्मयी व सौरभ यांनी २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली होती.
मृण्मयी अभिनयाबरोबरच सौरभबरोबर महाबळेश्वरला शेतीदेखील करते. ते शेतीत वेगवेगळे प्रयोगदेखील करतात. त्यांचे वर्कशॉपदेखील असतात. अनेकजण या वर्कशॉपमध्ये सहभागी होतात. त्यांची नील अँड मोमो ही कंपनी देखील आहे.
मृण्मयी तिच्या शेतातील अनेक व्हिडीओ शेअर करते. तिचे अनुभव सांगते. शेती, आजूबाजूच्या निसर्गाबद्दल ती कायमच भरभरून बोलताना दिसते. या सगळ्याबरोबरच मृण्मयी तिच्या अभिनयाच्या करिअरवरदेखील लक्ष देते. विविध चित्रपट, वेगळ्या धाटणीच्या भूमिका अशा माध्यमातून ती चाहत्यांचे मनोरंजन करते. आता आगामी काळात ती कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
