मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही आज तिचा ३७वा वाढदिवस सादरा करतेय. अनेक कलाकारांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर बहिणी गौतमीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत मृण्मयीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. या खास दिवशी मृण्मयीला तिच्या कुटुंबाकडून एक स्पेशल सरप्राईज मिळालं आहे. या सरप्राईजमुळे मृण्मयीचाआनंद गगनात मावेनासा झाला.

मृण्मयीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या सरप्राईजचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत मृण्मयूी सासरच्या घरी एन्ट्री करताच तिला भलं मोठं सरप्राईज मिळतं. मृण्मयीचे सासू-सासरे हातात सितार घेऊन उभे असतात. हे पाहून मृण्मयीला आनंदाचा धक्काच बसतो. ती उत्साहाने गिफ्ट दिलेलं सितार घेते आणि त्यावर तिचं नाव कोरलेलं असतं ते पाहून तिचा आनंद द्विगुणित होतो.

हेही वाचा… “मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण…”, गौरी खानचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल, म्हणाली…

मृण्मयीला सरप्राईज देताना तिचे सासू सासारे तर हजर होतेच पण तिचे आई-बाबादेखील व्हिडीओ कॉलवर उपस्थित होते आणि तिच्याशी गप्पा मारत होते. सतार पाहताच मृण्मयीने ती वाजवायला सुरुवात केलीय. शाळेनंतर खूप वर्षांनी ती सतार वाजवतेय असंही तिने या व्हिडीओमध्ये सांगितलं.

मृण्मयी असंही म्हणाली की, “मी खूप खूश आहे. मला याआधी आजोबांनी सतार दिली होती त्यामुळे ही खूप जास्त स्पेशल आहे आणि यावर माझं नावही आहे.” यानंतर तिने सतार कुठून आणली असं विचारलं. यावर मृण्मयीचे बाबा म्हणाले, मिरजवरून मागवली आहे.

हेही वाचा… ठरलं तर मग: साक्षीला होणार तुरुंगवास? अर्जुन-सायलीच्या मदतीने अखेर शिवानी देणार खरी साक्ष; पाहा प्रोमो

मृण्मयीचे बाबा असंही म्हणाले की, “ज्यांच्याकडून निलाद्री कुमार याने सतार बांधून घेतलीय तिथून ही सतार खास मृण्मयीसाठी बनवून घेतलीय.”

मृण्मयीच्या या खास दिवशी मात्र तिचा पती स्वप्नील तिथे उपस्थित नव्हता. मृण्मयीच्या या व्हिडीओवर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा… चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

दरम्यान, मृण्मयीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, मृण्मयी शेवटची ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात झळकली होती. या सिनेमात सुधीर फडके यांच्या पत्नी ललिताबाई फडके यांची भूमिका साकारली आहे. ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.