छोट्या पडद्यावरील मालिका, चित्रपट, नाटक ते वेबसीरिज अशा सगळ्या माध्यमांमध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने आपला ठसा उमटवला आहे. ‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ या मालिकांमुळे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे घराघरांत लोकप्रिय झाली. सिनेविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्यावर मृण्मयीने वैयक्तिक आयुष्यात २०१६ मध्ये स्वप्नील रावशी लग्न केलं. आज नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी, केव्हा, कधी…”, मराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “आम्ही स्त्रिया…”

मृण्मयी सध्या मुंबई सोडून महाबळेश्वरमध्ये तिच्या नवऱ्याबरोबर राहते. या जोडप्याने निसर्गाच्या सानिध्यात महाबळेश्वरमध्ये सुंदर असं घर बांधलं आहे. याच ठिकाणी दोघांनी ‘नील अँड मोमो फार्म’ नावाचा व्यवसाय सुरू केला आहे. दोघेही शेतात एकत्र काम करून नैसर्गिक उत्पादनांच्या निर्मितीवर भर देत आहेत. २०२० पासून मृण्मयी मुंबई सोडून महाबळेश्वरला स्थायिक झाली. येथील काही फोटो शेअर करत मृण्मयीने नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : तू है मेरी किरण! जुही चावलासाठी मराठमोळ्या गौरव मोरेने केलं असं काही की…पाहा व्हिडीओ

अभिनेत्रीने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये नवऱ्याला मिठी मारताना आणि दुसऱ्या फोटोत मृण्मयी स्वप्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असल्याचं पाहायला मिळत आहे. “Happy birthday राव…मी कायम अशी निवांतपणे तुझ्या पाठीशी असेन. आय लव्ह यू” असं कॅप्शन मृण्मयीने या फोटोंना दिलं आहे.

दरम्यान, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुखदा खांडेकर, उदय टिकेकर यांनी देखील मृण्मयीने शेअर केलेल्या फोटोंवर खास कमेंट्स करत स्वप्नीलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.