काही चित्रपटातील एखादे पात्र इतके दमदार असते की ते साकारणारा कलाकार नंतर रुपेरी पडद्यावर दिसला नाही तर चाहत्यांच्या लक्षात असतो. गाजलेल्या मराठी चित्रपटात असंच एक पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीने ऑक्सफर्डमधून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

‘मुळशी पॅटर्न’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातील चहावाली तुम्हाला आठवते का? ‘मुळशी पॅटर्न’मध्ये अभिनेत्री मालविका गायकवाड हिने चहावालीची भूमिका साकारली होती. हा तिचा पहिला चित्रपट होता, यानंतर ती रुपेरी पडद्यावर झळकली नाही, पण या एकमेव भूमिकेने तिला खूप लोकप्रियता मिळवून दिली.

मालविका ही पुण्यातच लहानाची मोठी झाली. पुण्याच्या सिंहगड कॉलेजमधून मालविकाने इंजिनिअरिंगची पदवी मिळवली होती. तिला आवड असल्याने तिने ‘मुळशी पॅटर्न’मधील भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती आणि तिची निवड झाली. मालविका ही बडोद्याच्या गायकवाड राजघराण्याची कन्या आहे.

‘मुळशी पॅटर्न’नंतर मालविकाने लग्न केलं आणि पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेली. मालविकाने तिच्या इन्स्टाग्राम एक पोस्ट केली आहे, ज्यात तिने आनंदाची बातमी शेअर केली आहे.

“ऑक्सफर्डमध्ये “डू फिडेम” म्हटलं – जो “मी शपथ घेते” साठी फॅन्सी लॅटिन शब्द आहे… खरं तर हे “आय अॅम इन!”चे ओरिजनल व्हर्जन आहे. आता मी ऑक्सफर्डची अधिकृत पदवीधर आहे”, असं कॅप्शन मालविकाने तिच्या या पोस्टला दिलं आहे.

मालविकाची पोस्ट

मालविकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करून तिचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, मालविका गायकवाडने २०२० साली सिद्धार्थ सिंघवीशी लग्न केलं. मधल्या काळात सेंद्रिय शेतीवषयी जागरूकता वाढावी म्हणून मित्रांच्या मदतीने ‘ द ऑरगॅनिक कार्बन’ नावाने कंपनी सुरू केली. याशिवाय ‘हंपी A2’ या नावाने कंपनी सुरू करून तिने दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली. मालविकाने व्यवसाय क्षेत्रात खूप नाव कमावलं आहे. तिचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे. तिची कंपनी शार्क टँक इंडिया या शोमध्येही आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यवसाय क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या मालविकाने आता इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.