सध्या मे महिना असल्यामुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या चालू आहेत. देशभरातील असंख्य लोक जोडून सुट्ट्या आल्या की, फिरायला जातात. केरळ, काश्मीर, उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, महाराष्ट्र अगदी सगळ्या प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. मे महिन्याच्या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी बरेच लोक थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात.

हेही वाचा : Video : RCB संघाने प्लेऑफ गाठल्यावर अनुष्का शर्मा झाली भावुक! विराट कोहलीला पाहून दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कलाकार नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर हे दोघंही आपल्या कुटुंबीयांबरोबर एकत्र गंगटोक फिरायला गेले आहेत. या कलाकारांनी मुंबईपासून दूर आपल्या कुटुंबासह सुट्ट्या एन्जॉय करायला गंगटोकची निवड केली. परंतु, पर्यटकांची तुफान गर्दी झाल्याने प्रसाद-नम्रताला तिथेही मुंबईप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

हेही वाचा : RCB ने प्लेऑफ गाठल्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची फक्त एका शब्दाची पोस्ट, म्हणाला…

प्रसाद खांडेकरने याबद्दलची खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. गंगटोकच्या वाहतूक कोंडीचा व्ह्यू दाखवताना अभिनेता लिहितो, “मुंबई असो वा गंगटोक ट्राफिक काय पाठलाग सोडत नाही…ट्राफिकमध्ये वैतागलेले ट्रेकर्स” या पोस्टमध्ये अभिनेत्याने त्याची पत्नी अल्पा खांडेकर, अभिनेत्री नम्रता संभेराव, तिचे पती योगेश संभेराव आणि त्यांचा मुलगा रुद्राज यांना टॅग केलं आहे. यावरून ही दोन्ही कुटुंब एकत्र फिरायला गेल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : आधी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, नंतर ओटीटी रिलीजसाठी घेतले कोट्यवधी; तुम्ही पाहिलेत का ‘हे’ बॉकबस्टर दाक्षिणात्य चित्रपट

दरम्यान, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. दोघांचे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील बरेच स्किट्स गाजले आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद खांडेकरने केलं होतं. यामध्ये कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळाली होती. याशिवाय नम्रता संभेरावच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकताच तिचा ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये तिच्यासह अभिनेत्री मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपट प्रदर्शित होण्याआधी प्रसादने नम्रताला खास पत्र लिहून शुभेच्छा दिल्या होता. सध्या या चित्रपट मराठी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.