Jhanvi Killekar On Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाल्याने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. कलाकारांनी नानांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यामध्ये आता ‘बिग बॉस’फेम मराठमोळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी जान्हवीला अश्रू अनावर झाले असून, तिने नानांबरोबर काम करण्याची संधी न मिळाल्याबद्दल दुःख व्यक्त केले.

जान्हवी किल्लेकरने इन्स्टाग्रामवर नाना पाटेकर यांना आदरांजली वाहिली असून, तिने व्हिडीओ शेअर केला आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ती म्हणाली, “सकाळी जेव्हा ही बातमी समजली की, नाना पाटेकर आता आपल्याबरोबर नाहीयेत, तेव्हापासून माझी खूप चलबिचल झाली आहे. मला सारखं रडायला येतं आहे. मला माहीत नाही का? माझी नानांशी कधी वैयक्तिक अशी भेट झालेली नाही; पण ते आपल्या अभिनय क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व होते.”

नाना पाटेकर यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली नाही – जान्हवी किल्लेकर

पुढे जान्हवी किल्लेकर म्हणाली, “अशा दिग्गज व्यक्तीबरोबर मला कधीच काम करायला नाही मिळालं, याचं खूप जास्त दुःख होतंय. ते आता आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्याबरोबर कधीच काम करण्याची संधी मिळाली नाही. हे दुर्दैव आहे.” नाना पाटेकर यांच्या निधनानंतर जान्हवी किल्लेकरने तिच्या भावना व्यक्त करताना तिचा अश्रूंचा बांध फुटला. सोशल मीडियावर आदरांजली वाहताना जान्हवीने लिहिले, “नानांबरोबर कधीच काम करण्याचा योग आला नाही, खरंच दुर्दैव माझं.”

जान्हवी किल्लेकरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नाना पाटेकर यांना आदरांजली वाहिली असून, एका नेटकऱ्याने लिहिले, “प्रत्येकानं नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनबरोबर जोडणं, हीच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली असेल.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “सिनेविश्वाचा क्रांतिवीर आणि रंगभूमीवरचा नटसम्राट आज शांत झाला.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “असा नटसम्राट पुन्हा होणं नाही… असा माणूस देवालापण का आवडणार नाही. नाना, भावपूर्ण श्रद्धांजली.”