ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे चाहते, मनोरंजन विश्वातील कलाकार तसेच राजकीय वर्तुळातील मान्यवर पुण्यातील त्यांच्या डोणजे गावी उपस्थित राहणार आहेत. गोव्यातील वैद्यकीय प्रकिया पूर्ण झाल्यावर त्याचं पार्थिव पुण्याच्या दिशेने रवाना असून, डोणजे येथील नानांच्या फार्महाऊसच्या आवारातच त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला जाईल.

नाना पाटेकरांचं पार्थिव गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी त्यांचा मुलगा मल्हार तसेच पत्नी निलकांती पाटेकर यांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, नाना पाटेकरांचं पार्थिव पुणे विमानतळावर आल्यानंतर तेथून डोणजे गावाकडे नेण्यासाठी प्रशासनाने आवश्यक तयारी केली आहे. नानांचं डोणजे येथील त्यांच्या फार्महाऊसशी विशेष नातं होतं. याचठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच नानांच्या अंत्यविधीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत, ते डोणजे गावात दाखल झाले आहेत.

नाना पाटेकरांनी ७५ व्या वर्षी गोव्यात घेतला अखेरचा श्वास…

नाना पाटेकर यांचं वयाच्या ७५ व्या वर्षी आज, सकाळी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. नाना हे गोव्यातील डोना पाउला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले होते, त्यानंतर त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. सकाळी ५:२० च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नाना पाटेकरांचे निधन झालं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.