नाना पाटेकर कायम इतरांसाठी त्यांच्या कठीण काळात धावून जायचे. चांगलं काम केल्यास कौतुक करायचे आणि गरज पडल्यास कानही धरायचे असं अनेक कलाकार आता त्यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा देताना सांगत आहेत. प्रवीण तरडे त्यापैकीच एक. काही दिवसांपूर्वीसुद्धा त्यांनी त्यांचा ‘देऊळ बंद २’ रिलीज झाल्यानंतर याबद्दल भाष्य केलं होतं आणि नाना पाटेकरांनी कशाप्रकारे पाठिंबा दिला होता याबद्दल सांगितलं होतं.
निलकांती व नाना पाटेकर यांनी प्रवीण तरडेंना केलेली मदत
२१ मे रोजी प्रवीण तरडेंचा ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. त्यावेळी नाना पाटेकर यांनी त्यांना फोन केला होता असं प्रवीण तरडे यांनी तारांगणशी संवाद साधताना सांगितलं आहे. अभिनेते याबद्दल म्हणाले, “देऊळ बंद यशस्वी झाल्यानंतर मला सगळ्यात आधी नाना पाटेकर यांचा फोन आला होता. नुसता फोन करुन नाही थांबले त्यांच्या शेतावर गावाला काम करणाऱ्या सगळ्या महिनाला २६-२४ महिला होत्या त्यांना घेऊन निलकांती पाटेकर अभिरुची सिटीप्राइडला स्वत: तिकीट काढून आल्या आणि सगळ्या बायकांबरोबर त्यांनी देऊळ बंद २ चित्रपट पाहिला. त्यामुळे नाना पाटेकर आणि निलकांती पाटेकर यांचा मी आभारी आहे. सगळ्यात पहिला फोन मला या लोकांचा आला होता आणि तिथून मला खरी उभारी मिळाली.”
नाना पाटेकरांनी आजवर अनेक कलाकारांना त्यांच्या कठीण काळात मदतीचा हात दिला, त्यांना चित्रपटांमध्ये काम दिलं, मार्गदर्शनही केलं आणि गरज पडल्यास कानही टोचले. स्पष्टवक्तेपणा आणि दमदार अभिनय यासाठी ओळखले जाणारे नाना पाटेकर ८ ऑक्टोबर रोजी काळाच्या पडद्याआड झाले आणि त्यांच्या निधनानंतर मनोरंजनविश्वाने एक अष्टपैलू नट गमावला. त्यांचं निधन अनेकांसाठी मोठा धक्का होता. त्यामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त करत त्यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रवीण तरडे नाना पाटेकर यांच्या अंत्यविधीसाठी पुण्यातील त्यांच्या डोणजे गावी गेले होते. त्यावेळी इतरही मराठी कलाकार उपस्थित होते. मात्र बॉलीवूडमधील कलाकारांच्या गैरहजेरीमुळे प्रवीण तरडेंनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी गोव्यात नाना पाटेकर यांचं निधन झालं.त्यांनी त्यांच्या कलाकृतींमधून प्रेक्षकांचं केलेलं मनोरंजन आणि अभिनया पलीकडे जाऊन केलेलं समाजकार्य यासाठी अनेक जण त्यांचं कौतुक करत आहेत.
