मुख्यमंत्री पदासाठी आखलेले कारस्थान अन् उद्धवस्त झालेले कुटुंब, 'चाणक्य' चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा | Navalakha Arts Chanakya new marathi movie poster release nrp 97 | Loksatta

मुख्यमंत्री पदासाठी आखलेले कारस्थान अन् उद्धवस्त झालेले कुटुंब, ‘चाणक्य’ चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा

काही वर्षांतील राजकारणातील थरारनाट्य “चाणक्य” चित्रपटातून उलगडणार असल्याचं स्पष्ट होतं.

मुख्यमंत्री पदासाठी आखलेले कारस्थान अन् उद्धवस्त झालेले कुटुंब, ‘चाणक्य’ चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या आठ वर्षांत खूप उलथापालथ झाली आहे. आता याच राजकीय नाट्याचा थरार आगामी ‘चाणक्य’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय महानाट्यांचा हा वास्तवदर्शी चरित्रपट आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

नुकतंच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरवर सभेसाठी जमलेल्या प्रचंड मोठ्या जनसमुदायासमोर भाषण करणारा एक नेता दाखवण्यात आला आहे. तर त्याच्या पाठीत खुपसलेला खंजीर हे दृश्य चित्रपटाच्या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील राजकारणातील थरारनाट्य “चाणक्य” चित्रपटातून उलगडणार असल्याचं स्पष्ट होतं. या चित्रपटाच्या पोस्टरमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. राजकीय क्षेत्रातही अनेक अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.
आणखी वाचा : Video : जॅकी श्रॉफ यांना पाहताच अमित ठाकरेंनी घेतला आशीर्वाद; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल!

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माते निलेश नवलाखा यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. निलेश नवलाखा यांनी मराठी चित्रपटांना वास्तवाजवळ नेऊन चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर ते आता स्वतः लेखन आणि दिग्दर्शनाकडे वळले आहेत. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण या ताज्या आणि सामान्य माणसांच्या कल्पनेपलीकडील उलथापालथींना भरलेल्या धारदार अशा ‘पोलिटिकल थ्रिलर’ विषयाची निवड केली आहे.

आणखी वाचा : “मी हा चित्रपट…” ‘महाभारता’त कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया

‘चाणक्य’ या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. तसेच चित्रपटाची निर्मितीही ते स्वत: करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामुळे उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाची आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी आखलेले कट-कारस्थान, शह-काटशह, राजकीय सूडनाट्‌य आणि गद्दारीची गोष्ट या चित्रपटाद्वारे उलगडणार आहे.

येत्या २०२३मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं धडाकेबाज पोस्टर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लाँच करण्यात आले. नवलाखा आर्ट्स मीडिया अँड एंटरटेनमेंट च्या माध्यमातून निलेश नवलाखा यांनी “शाळा,” अनुमती आणि “फँड्री” या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच त्यांनी निर्मिती केलेल्या “राक्षस” या चित्रपटाचंही कौतुक झालं होतं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“माझ्या अत्यंत…” अमिताभ बच्चन यांना मराठी चित्रपटाची भूरळ

संबंधित बातम्या

“माहेरची साडी चित्रपटावेळी आम्ही…” अलका कुबल यांनी सांगितली विक्रम गोखलेंची आठवण
शरद पोंक्षेंनी थेट सावरकरांच्या कोठडीतून शेअर केला व्हिडीओ, अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना दिलं आव्हान, म्हणाले “अरे ए मूर्खा…”
Ved Teaser : “…तर काही प्रेमातलं वेड होतात” रितेश-जिनिलीयाच्या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रामदेव बाबांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन महुआ मोईत्रांची खोचक टीका; म्हणाल्या, “आता मला कळलं तुम्ही त्यावेळी महिलेच्या…”
अरे बापरे! क्रूझमधून समुद्रात पडला प्रवासी; अन् पुढे घडलं असं काही…व्हिडीओ व्हायरल
“लवकरच कठोर पावलं…”, संजय राऊतांचं सूचक विधान, राज्यपालांच्या वक्तव्यावरून राज्यात वातावरण आणखीन तापणार?
हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय? ‘हे’ घरगुती उपाय उपाय करून पाहा नक्की दिसेल फरक
पाठ्यपुस्तकात ‘२६/११’चा धडा घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती