Navra Maza Navsacha 2 : सचिन व सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ अशी दमदार स्टारकास्ट असणारा 'नवरा माझा नवसाचा' चित्रपट २००४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाच्या सीक्वेलची मागणी प्रेक्षकांकडून वारंवार करण्यात येत होती. अखेर सर्व चाहत्यांनी इच्छा आता लवकरच पूर्ण होणार असून 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाचा दुसरा भाग आता येत्या २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नवरा माझा नवसाचा २' ( Navra Maza Navsacha 2 ) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून देखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता चित्रपटाच्या टीमने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'नवरा माझा नवसाचा' या पहिल्या भागात प्रसिद्ध गायक सोनू निगमने गायलेलं "हिरवा निसर्ग…" गाणं सर्वत्र लोकप्रिय झालं होतं. हे सहाबहार गाणं आजही प्रत्येकाच्या ओठावर असतं. आता दुसऱ्या भागात सुद्धा सोनू निगम एक खास गाणं गाणार आहे. हेही वाचा : ‘बिग बॉस’ फेम जय दुधाणेच्या घरी आली नवीन पाहुणी; खरेदी केली आलिशान गाडी, कुटुंबासह शेअर केला फोटो सोनू निगमने गायलं आहे खास गाणं सोनू निगम चित्रपटात कोणतं गाणं गाणार याची अपडेट 'नवरा माझा नवसाचा २'च्या ( Navra Maza Navsacha 2 ) टीमकडून अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 'सुपारी फुटली' हे गाणं सोनूने दुसऱ्या भागात गायलं आहे. हे गाणं गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजेच उद्या ( ७ सप्टेंबर ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनू निगमचा सेटवरचा BTS व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. याशिवाय 'हिरवा निसर्ग' गाण्याची लोकप्रियता पाहता सोनू निगम दुसऱ्या भागातही गाणं गातोय हे पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. Navra Maza Navsacha 2 : सुपारी फुटली गाण्याचं पोस्टर हेही वाचा : Shilpa Shinde : “तसले कपडे घालून, मला खुश कर आणि…”, अभिनेत्री शिल्पा शिंदेचा निर्मात्यावर लैंगिक शोषणाचा आरोप दरम्यान, वॅकी आणि त्याचे कुटुंबीय यावेळी एसटी सोडून कोकण रेल्वेने गणपती पुळ्याला का निघालेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना २० सप्टेंबरला चित्रपटगृहात मिळणार आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट या ( Navra Maza Navsacha 2 ) चित्रपटात झळकणार आहे.