Navra Maza Navsacha Marathi Movie Quiz : सचिन पिळगांवकरांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन चित्रपट २००४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये नायकाच्या वडिलांनी बाप्पाकडे नवस केलेला असतो. हा नवस फेडताना नायकाची कशी तारांबळ उडते अन् त्यानंतर गणपती बाप्पा त्याच्याकडून कसा नवस फेडून घेतो, यादरम्यान होणारी खलनायकाची एन्ट्री या सगळ्या गोष्टी रंजक पद्धतीने पाहायला मिळतात. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी असून काही कलाकारांचे कॅमिओ देखील आहेत. आता या चित्रपटाचा दुसरा भाग शुक्रवारी ( २० सप्टेंबर ) प्रदर्शित होत आहे.

आज २० वर्षांनंतरही ‘नवरा माझा नवसाचा’ ( Navra Maza Navsacha ) या चित्रपटाबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आहेत. या चित्रपटाचे तुम्ही देखील दर्दी चाहते असाल तर क्विझ खास तुमच्यासाठी आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटासंदर्भात या क्विझमध्ये एकूण दहा प्रश्न आहेत.

navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
Navra Maza Navsacha 2
‘नवरा माझा नवसाचा २’ ते ‘हे’ चित्रपट पाहता येणार फक्त ९९ रुपयांत, चित्रपटप्रेमींसाठी खास ऑफर; काय आहे निमित्त?
Utkarsh Shinde
‘नवरा माझा नवसाचा २’ पाहिल्यावर उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “हा चित्रपट कौटुंबिक बंध…”
Navra Maza Navsacha 2 Box Office Collection Day 3 (1)
‘नवरा माझा नवसाचा २’च्या कमाईत तिसऱ्या दिवशी मोठी वाढ, एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या
Navra Maza Navsacha 2 Box Office Collection
‘नवरा माझा नवसाचा २’ ची दमदार ओपनिंग, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Mumbai: Video Of Last Man To Take Darshan Of Lalbaugcha Raja Goes Viral
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO

हेही वाचा : नवरा माझा नवसाचा २ : यंदा एसटी ऐवजी कोकण रेल्वे का निवडली? स्वत: सचिन-सुप्रिया यांनी सांगितलं कारण…; पाहा व्हिडीओ

‘नवरा माझा नवसाचा’ या एव्हरग्रीन चित्रपटाचा दुसरा भाग आता २० सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने सचिन पिळगांवकरांनी लोकसत्ताचं क्विझ सोडवा आणि चित्रपट पाहायला सुद्धा आवर्जून या असं आवाहन केलं आहे.

सचिन पिळगांवकरांनी केलं आवाहन

‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटासंदर्भातील क्विझ

हे क्विझ तुम्हाला आवडल्यास या १० प्रश्नांची अचूक उत्तरं द्या आणि तुमच्या इतर सहकाऱ्यांनाही पाठवा. दरम्यान, अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट ‘नवरा माझा नवसाचा २’ या  चित्रपटात झळकणार आहे.