सर्वोच्च न्यायालयाने आज(१८ मे) बैलगाडा शर्यती व जल्लीकट्टू खेळांसंदर्भात मोठा निर्णय दिला आहे. डिसेंबर महिन्यात यासंदर्भातली सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आज याबाबत निकाल दिला गेला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचा थरार रंगणार आहे.

महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू होणार असल्यामुळे बैलगाडाप्रेमींकडून जल्लोष करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार व अभिनेते अमोल कोल्हेंनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये ते “एका होऊ घातलेल्या राजकीय करिअरची आत्महत्या झाली तरी चालेल, पण बैलगाडा शर्यत सुरू राहिल्याशिवाय गप्प राहणार नाही. एवढा तुम्हा सगळ्यांना शब्द देतो, जय शिवराय,” असं म्हणताना दिसत आहेत.

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक

अमोल कोल्हेंनी व्हिडीओ शेअर करत “बैलगाडा मालक, शौकीन व बळीराजाने काळजात जपलेली या मातीतील बैलगाडा शर्यत कायमस्वरूपी सुरू! हा विजय ऐन बंदीच्या काळात दावणीला बांधलेल्या बैलाला आपल्या मुलांप्रमाणे जीव लावणाऱ्या सर्व बैलगाडा मालकांना समर्पित करतो! शर्यत सुरू करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार!” असं म्हटलं आहे.

हेही वाचा>> “भिर्रर्रर्र…”, बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “खिल्लार या देशी गोवंशाची…”

बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर अमोल कोल्हेंनी “ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अनेक वर्षं बैलगाडा मालकांनी हा लढा दिला आहे. हे सर्वांचं यश आहे. मी सरकारचंही मनापासून आभार मानतो. मविआचं सरकार असताना तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी हिरीरीनं पुढाकार घेऊन हा खटला उभा राहण्यासाठी प्रयत्न केले. पहिल्या टप्प्यात अटी-शर्थींसह परवानगी दिली होती”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा>> अमोल कोल्हेंच्या नाटकाला सुप्रिया सुळेंची हजेरी, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “शिवपुत्र संभाजी…”

दरम्यान, बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू झाल्यानंतर अमोल कोल्हे व आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांमध्ये श्रेयवादावरून स्टेटस वॉर बघायला मिळत आहे. “आपल्या फकड्याने करून दाखवलं” असे खासदार अमोल कोल्हेंच्या समर्थकांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवून आमदार महेश लांडगेंच्या समर्थकांना डिवचले आहे. तर, आमदार महेश लांडगेंच्या समर्थकांनी “पैलवानाने करून दाखवले” असे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवले असून चोख प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही समर्थकांमध्ये स्टेटस वॉर रंगल्याचे चित्र आहे.