scorecardresearch

Video: चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात पडता पडता वाचली नेहा पेंडसे, व्हिडीओ व्हायरल

नेहा पेंडसेने एक योगा ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न केला आहे.

neha pendse

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने मराठीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली. आतापर्यंत तिने अनेक मराठी, हिंदी, दक्षिणात्य चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती मालिका, चित्रपट यांपासून थोडी दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांशी संपर्कात असते. आता नुकताच तिने तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला जो चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ट्रेंड्स व्हायरल होत असतात. हे ट्रेंड्स सेलिब्रिटी देखील फॉलो करताना दिसतात. आता नेहा पेंडसेनेही एक योगा ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते करताना ती पडता पडता वाचली असा एक गमतीशीर व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

आणखी वाचा : बिरबलाच्या भूमिकेतील फर्स्ट लूकमुळे सुबोध भावे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “अरे देवा…”

नेहाने नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ती एक योगा चॅलेंज करण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे करत असताना तिला तिचा बॅलन्स सांभाळता आला नाही आणि ती डगमगू लागली. आपला बॅलन्स जात आहे हे कळताच तिने पाय खाली ठेवला आणि स्वतःला पडण्यापासून वाचवलं.

हेही वाचा : ‘भाबीजी…’ मालिका सोडण्याचे नेहा पेंडसेचे कारण आले समोर

आता तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या मजेशीर व्हिडिओवर तिच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील तिच्या काही मित्र मैत्रिणी देखील कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचा गमतीशीर व्हिडिओ सध्या सगळ्यांना आवडत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 12:00 IST
ताज्या बातम्या