सध्या शाहरुख खानच्या जवान चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. अशातच समीर वानखेडेंनी मराठी चित्रपट ‘सुभेदार’ पाहिला. श्री शिवराज अष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या चित्रपटानंतर दिग्पाल लांजेकरने ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांनी नुकताच पाहिला. त्यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर पोस्ट शेअर केली आहे.

२५ कोटींच्या लाच प्रकरणात समीर वानखेडेंच्या बाजुने निकाल, आर्यनला सोडण्यासाठी शाहरुख खानकडून पैसे मागितल्याचा होता आरोप

Raj Thackeray And Ratan Tata News
Ratan Tata : राज ठाकरेंच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या नाशिकच्या प्रोजेक्टची रतन टाटांना पडली होती भुरळ, म्हणाले होते…
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Prime Minister Narendra Modi with Israeli counterpart Benjamin Netanyahu
Israel Attack : इस्रायल- लेबनॉनदरम्यान वाढत्या संघर्षावर मोदींचा थेट बिन्यामिन नेतान्याहू यांना फोन; म्हणाले, “जगात…”
Bengaluru Mahalaxmi Murder Updates in Marathi
Bengaluru Murder : “फ्रिजमध्ये माझ्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडे पाहिले आणि…”, बंगळुरुत हत्या झालेल्या महालक्ष्मीच्या आईने काय सांगितलं?
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
EY Ex Employee Exposed
EY Exposed : “४०० इमेल्स पाठवले, पण तरीही प्रमाणपत्र दिले नाहीत”, EY च्या माजी कर्मचाऱ्याचा खुलासा; म्हणाले…
Protest broke out at the Bengaluru college after the recording incident came to light
कॉलेजच्या बाथरूममध्ये महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, रंगेहाथ पकडल्यावर म्हणाला…
IND vs BAN Sanjay Manjrekar on Virat Kohli DRS Blunder
IND vs BAN : ‘आज विराटसाठी वाईट वाटलं…’, कोहलीच्या DRS न घेण्यावर संजय मांजरेकरांचं वक्तव्य; म्हणाले, ‘त्याने संघासाठी…’

समीर वानखेडे यांनी मॉलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते चित्रपट पाहायला आल्याचं दिसतंय. “एक महान योद्धा आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असलेले सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित एक सुंदर मराठी चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. त्यांचे नाव पराक्रम आणि शौर्याचे प्रतिक आहे. प्रत्येक भारतीयाने अनुकरण करावे, असे ते खरे वीर होते,” असं समीर वानखेडेंनी म्हटलं आहे.

३१ ऑगस्टला ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरमध्ये ‘जवान’च्या एका सीनमध्ये शाहरुख खान ‘मुलाला हात लावण्याआधी बापाशी बोल’ असं म्हणताना दिसत होता. त्यानंतर हा डायलॉग समीर वानखेडेंसाठी असल्याचं नेटकरी म्हणत होते. इतकंच नव्हे तर समीर वानखेडे ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले होते. नंतर समीर यांनी एक क्रिप्टिक पोस्टही शेअर केली होती. 

“मुलाला हात लावण्याआधी…”, ‘जवान’मधील शाहरुख खानचा ‘तो’ डायलॉग ऐकून नेटकऱ्यांना आठवले समीर वानखेडे; म्हणाले…

दरम्यान, ‘सुभेदार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये चिन्मय मांडलकेर, अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.