Vinesh Phogat in Paris Olympics 2024: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दमदार कामगिरी करत पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. तिने आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनची ओक्साना लिवाच हिचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. विनेशच्या या कामगिरीसाठी तिचं कौतुक होत आहे. मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेने विनेशसाठी केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

हेमंतने विनेशचे दोन फोटो शेअर करत त्याबरोबर कॅप्शन लिहिलं आहे. विनेश फोगटसह काही कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनातील एक फोटो हेमंतने शेअर केला आहे, तर तिचा दुसरा फोटो हा कुस्तीच्या मैदानातील आहे.

chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती
Renukaswamy murder case photo
Pavithra Gowda: ‘खून होण्याआधी तो हात जोडून…’, अभिनेता दर्शनच्या अत्याचारामुळे मृत चाहत्याचे पालक हादरले
What does the Hema committee report say about the casting couch in Malayalam cinema
मल्याळी चित्रपटसृष्टीतही ‘कास्टिंग काऊच’? काय सांगतो न्या. हेमा समिती अहवाल?
badlapur crime news marathi actress shared angry post
“हाल हाल करून मारा”, बदलापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “काहीतरी भीषण…”
Yuvraj Singh Biopic Announced Bhushan Kumar And Ravi Bhagchandka Will Produce
Yuvraj Singh Biopic: वर्ल्डकप हिरो ते कर्करोगावर मात; युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा, मोठ्या पडद्यावर येणार सिक्सर किंगचा प्रेरणादायी प्रवास
Manu Bhaker Statement on Bond with Coach Jaspal Rana
Manu Bhaker: ‘ते कदाचित माझ्या कानशिलात लगावतील…’, मनू भाकेर कोच जसपाल राणा यांच्याबद्दल असं का म्हणाली?

Vinesh Phogat: विनेश फोगट उपांत्य फेरीत, अवघ्या पाऊण तासात दोन बड्या कुस्तीपटूंना दिला धोबीपछाड, पाहा VIDEO

“सत्याचा आणि निश्चयाचा कायम विजय होतो! खूप खूप शुभेच्छा विनेश..या देशाला, आम्हा सगळ्यांना आपला अभिमान आहे. आता गोल्ड मेडलच पाहिजे,” असं हेमंतने विनेशचे फोटो शेअर करत लिहिलं आहे.

hemant dhome post for vinesh phogat
हेमंत ढोमेने शेअर केलेली पोस्ट (फोटो – स्क्रीनशॉट)

 Neeraj Chopra Men’s Javelin Throw: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा अंतिम फेरीत; ८९.३४ अंतरावर खणखणीत थ्रो, पाहा VIDEO

विनेश फोगटची दमदार कामगिरी

कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता ती आपल्या ऐतिहासिक पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे. विनेशने कुस्तीच्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात जपानची टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू युई सुसाकी हिला ३-२ च्या फरकाने पराभूत केलं. या सामन्यात, विनेश पहिल्या फेरीत ०-१ ने पिछाडीवर होती पण शेवटच्या ३० सेकंदात तिने दमदार कामगिरी करत विजय मिळवला.

Priyanka Goswami: ऑलिम्पिकला जाऊन रिल बनविणारी प्रियांका गोस्वामी ट्रोल; ४५ खेळाडूंमध्ये आला ४१ वा क्रमांक

यानंतर विनेशने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या ओक्साना लिवाचला ७-५ ने पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली. तिने पाऊण तासात दोन सामने जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिचा उपांत्य सामना आज रात्री १०.१५ वाजता क्युबाची कुस्तीपटू गुझमन लोपेझशी होणार आहे. आता भारतीयांचे लक्ष तिच्या उपांत्य फेरीत खेळाकडे लागले आहे.