Sulochana Latkar Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्या ९४ वर्षांच्या होत्या. दादर येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांच्या निधानानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

सुलोचना दीदींच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं दु:ख

सुलोचना दीदींच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. फडणवीस यांनी ट्वीट करत सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. फडणवीसांनी ट्वीटमध्ये लिहलं आहे “तीनशेहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचनादीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आज महाराष्ट्र मुकला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्याही काळात आघाडीच्या अभिनेत्री म्हणून त्यांनी मोठा कालखंड गाजवला आणि त्यानंतर सुद्धा सातत्याने विविध भूमिका त्यांनी साकार केल्या. जवळजवळ 50 हून अधिक वर्ष त्यांनी चित्रपटाचा पडदा गाजविला. व्यक्तिरेखा हुबेहूब जिवंत करणाऱ्या वात्सल्यमूर्ती आणि एका महान कलावंताला आज आपण सारे मुकलो आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शान्ति”

सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं दु:ख

सुलोचना दीदीच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केलं. सुप्रिया सुळेंनी ट्वीटमध्ये लिहिंल आहे. “ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाले. हि बातमी अतिशय दुःखद आहे. गेली काही दशके त्यांनी हिंदी, मराठी भाषेत रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या. त्यांनी साकारलेल्या या अनेक भूमिका रसिकांच्या आजही लक्षात आहेत. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला. भावपूर्ण श्रद्धांजली.”

नितीन गडकरींनी वाहिली श्रद्धांजली

सुलोचना दीदीच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शोक व्यक्त केला आहे. ट्वीट करत गडकरींनी सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. गडकरींनी ट्वीटमध्ये लिहंल आहे. “ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. सुलोचना दिदींचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत झाला आहे. हिंदी व मराठी चित्रपटांतून चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.”

काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी व्यक्त केला शोक

काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनीही सुलोचना दीदींच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. चव्हाणांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे. “ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. समर्थ अभिनय व अनेक लोकप्रिय भूमिकांमुळे त्या घराघरात परिचित होत्या. अनेक नामवंत व दिग्गज कलावंतांसमवेत त्यांनी काम केले आणि मराठीसह हिंदी चित्रसृष्टीतही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

काँग्रेस नेते धीरज देशमुखांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींच्या निधनानंतर काँग्रेस नेते धीरज देशमुखांनी श्रद्धांजली वाहत दु:ख व्यक्त केलं आहे. धीरज देशमुखांनी ट्वीटमध्ये लिहंल आहे ” मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या व महाराष्ट्राचे भूषण असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री #सुलोचनादीदी (सुलोचना लाटकर) यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने आपल्या अनेकांच्या मनातील वात्सल्यमूर्ती हरपली आहे.”

शरद पवारांचं ट्वीट

सुलोचना दीदी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी ( ५ मे ) सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रभादेवी येथील घरी सुलोचना दीदी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत सुलोचना दीदी यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

Story img Loader