पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित महिला दरवर्षी वटपौर्णिमेचा सण साजरा करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून उपवास करतात. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला ही वटपौर्णिमा साजरी केली जाते. मराठी कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींची नवीन लग्न झाली आहेत. त्यामुळे यंदा पूजा सावंत, मुग्धा वैशंपायन, योगिता चव्हाण, शिवानी सुर्वे अशाच बऱ्याच अभिनेत्री लग्नानंतर त्यांची पहिली वटपौर्णिमा साजरा करणार आहेत.

अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या पहिल्या वटपौर्णिमेची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. पूजाचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो हे आता सर्वश्रूत आहे. लग्नानंतर अभिनेत्री देखील आपल्या नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियात गेली होती. याठिकाणी या दोघांनी गुढीपाडवा, होळी हे सण एकत्र साजरे केले होते. यानंतर पूजा एकटीच भारतात परतली होती. मुंबईत आल्यावर अभिनेत्रीने लग्नानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली होती.

हेही वाचा : Video : ‘येरे येरे पैसा ३’ मध्ये झळकणार ‘हे’ कलाकार, दिग्दर्शकासह एकत्र केला डान्स! चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

आता पूजाचा नवरा जरी ऑस्ट्रेलियात असला तरीही अभिनेत्रीने तिची पहिली वटपौर्णिमा भारतात साजरी केली आहे. पूजाची बहीण रुचिराने ‘बहिणीची पहिली वटपौर्णिमा’ असं कॅप्शन देत अभिनेत्रीचे सुंदर फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. पूजाने अगदी पारंपरिक पद्धतीने लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे. पारंपरिक अशा लूकमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत होती.

हेही वाचा : Video : मराठमोळ्या ऋतुजा बागवेचा हिंदी अभिनेत्यासह ‘पुष्पा’ स्टाइल जबरदस्त डान्स! ‘सूसेकी’ गाण्यावर थिरकले

वटपौर्णिमेच्या सणाला पूजाने पिवळ्या व त्याला लाल रंगाचा काठ असलेली सुंदर अशी साडी नेसली होती. यावर तिने एकच ठुशी घालून, गळ्यात सुंदर असं मोठं मंगळसूत्र घातलं होतं. नाकात नथ, हातात हिरवा चुडा… पूजाच्या या सुंदर लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वटपौर्णिमेच्या फोटोंना अभिनेत्रीने “पहिली वटपौर्णिमा सिद्धेश मिस यू” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : “पाठीवरुन हात फिरवला…”, नाना पाटेकरांना भेटून गौरव मोरे भारावला; फोटो शेअर म्हणाला…

पूजा सावंत इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, पूजा सावंतने यावर्षी २८ फेब्रुवारीला सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली. त्यांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने जमवण्यात आलं होतं. अभिनेत्रीने आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनय क्षेत्रात यश मिळवल्यावर वैयक्तिक आयुष्यात पूजाने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. तिच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित राहिले होते.