Pooja Sawant : महाराष्ट्राची ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंत यावर्षी फेब्रुवारी महिन्यात विवाहबंधनात अडकली. तिच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. पूजाचा पती सिद्धेश चव्हाण कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे अभिनेत्री लग्नानंतर काही दिवसांनी आपल्या नवऱ्यासह परदेशात रवाना झाली. नवऱ्याबरोबर होळी अन् गुढीपाडवा साजरा करून पूजा मध्यंतरी भारतात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा ती ऑस्ट्रेलियाला गेली.

पूजा व तिचा ऑस्ट्रेलियात असताना सगळे सण अगदी मराठमोळ्या पद्धतीने साजरे करतात. पूजा सावंत गणेशोत्सवासाठी भारतात येणार की नाही याबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर गणेश चतुर्थीला “गणपती बाप्पांसह… आम्हीही आमच्या घरी आलो” असं कॅप्शन देत पूजाने घरच्या बाप्पाचा खास फोटो शेअर करत भारतात आल्याचं तिच्या सर्व चाहत्यांना सांगितलं.

navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
amitabh bachchan talked about rekha
रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”
Mitali And Siddharth
“असाच हात घट्ट पकडून…”, सिद्धार्थ चांदेकरची मितालीसाठी खास पोस्ट; व्हिडीओ शेअर करीत म्हणाला, “माझी भिंगरी…”
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
rinku rajguru shared video of akash thosar
Video : परश्या मनसोक्तपणे खातोय उकडीचा मोदक अन् आर्ची…; रिंकू राजगुरुच्या ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष
Vivek Oberoi shifted to Dubai
तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”
malaika Arora post about father death
वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट; म्हणाली, “आमचे प्रिय बाबा…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : अखेर दोन रांगडे गडी एकमेकांना भिडणार! संग्राम-अरबाजमध्ये कोण मारणार बाजी? कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले…

काय म्हणाली पूजा सावंत?

पूजा सावंतने ( Pooja Sawant ) आज तिच्या नवऱ्यासह जी.एस.बी. वडाळा येथील मानाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. याबद्दल अभिनेत्री म्हणते, “GSB वडाळ्याच्या गणपतीला मी लहानपणापासून येते. याआधी मी शूटमधून वेळ काढून बाप्पाच्या पाया पडण्यासाठी यायचे. यावर्षी मी नेमकी देशात नव्हते… मी बाहेरगावी होते. पण, अचानक मी आणि सिद्धेशने भारतात यायचं निश्चित केलं. लगेच विमानाची तिकिटं बूक केली आणि आम्ही इथे आलो. आज काहीही प्लॅन नसताना मी इथे आले…पण, हे वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे. कारण, बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही दोघं यावर्षी जोड्याने आलोय. त्यामुळे खरंच खूप जास्त स्पेशल फिलिंग माझ्या मनात या क्षणाला आहे.”

दरम्यान, अभिनेत्री पूजा सावंत ( Pooja Sawant ) व तिचा नवरा सिद्धेश हे दोघंही पारंपरिक लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होते. या दोघांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने जमलं आहे. एकमेकांचे फोटो पाहिल्यावर पूजा आणि सिद्धेशमध्ये चांगली मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पूजाने लवकरच लग्न करणार असल्याचं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सांगितलं होतं. यानंतर पूजा आणि सिद्धेश फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकले.

Pooja Sawant
पूजा सावंत ( Pooja Sawant )

दरम्यान, पूजाच्या ( Pooja Sawant ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती शेवटची पुष्कर जोगच्या ‘मुसाफिरा’ चित्रपटात झळकली होती. याशिवाय तिचं नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘नाच गो बया’ हे गाणं देखील सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलं आहे.