अभिनेत्री पूजा सावंतचा साखरपुडा १६ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. अभिनेत्रीच्या साखरपुड्याचे बरेच फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच पूजाने साखरपुड्यातील एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये अभिनेत्री भर कार्यक्रमात होणाऱ्या नवऱ्याला प्रेमाने लग्नाची मागणी घालत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पूजा व सिद्धेश यांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने जमलं आहे. त्यामुळे साखरपुड्याच्या दिवशी अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याला हटके स्टाइलमध्ये प्रपोज केलं आहे. पूजा म्हणते, “तेव्हा कुठेतरी प्रेमावरचा विश्वास उडून गेला होता. मला कधीच नव्हतं वाटलं की, मी कोणावर इतकं प्रेम करू शकते. तू आलास अन् माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. जर तू मला लग्नासाठी विचारलं नसतं, तर मी स्वत:हून तुला लग्नासाठी नक्कीच विचारलं असतं. आज सगळ्या कुटुंबीयांसमक्ष मी तुला विचारते…माझ्याशी लग्न करशील का?”

हेही वाचा : Video: ‘पार्वती’ ने भावाच्या मित्राशी बांधली लग्नगाठ, बिझनेसमन आहे पती, शाही सोहळ्याचा पहिला व्हिडीओ आला समोर

पूजाने भर साखरपुड्यात घातलेली लग्नाची मागणी ऐकून सिद्धेश खूपच भारावल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. होणाऱ्या बायकोला घट्ट मिठी मारत त्याने पूजाला अंगठी घातली. यावेळी दोघांच्या कुटुंबीयांसह भूषण प्रधान, गश्मीर व गौरी महाजनी, प्रार्थना बेहेरे व अभिषेक जावकर, वैभव तत्त्ववादी, फुलवा खामकर असे मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते.

हेही वाचा : शिवजयंतीच्या मुहूर्तावर रितेश देशमुखची मोठी घोषणा! २०२५ मध्ये मोठ्या पडद्यावर येणार ‘राजा शिवाजी’, पोस्टर आलं समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूजा व सिद्धेश आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. अभिनेत्रीच्या संगीत व मेहंदी सोहळ्यासाठी तिचे जवळचे मित्र-मैत्रिणी डान्सची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचे सगळेच चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.