‘दगडी चाळ’ चित्रपटातून घराघरांत लोकप्रिय झालेली महाराष्ट्राची ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं. आजवर अनेक चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. वैयक्तिक आयुष्यात पूजाने यंदा २८ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली.

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण यांचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या नवऱ्याबरोबर सोशल मीडियावर फोटो शेअर करत पूजाने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. यानंतर सर्वत्र अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा रंगली होती. अखेर फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद, ग्रहमख असे सगळे विधी करत पूजाने २८ फेब्रुवारीला सिद्धेश चव्हाणशी लग्न केलं.

हेही वाचा : Video: कौतुकास्पद! प्रसिद्ध गायिकेनं ३००० मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

पूजाचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळे लग्नानंतर जवळपास १ ते दीड महिने पूजा ऑस्ट्रेलियात राहिली होती. याठिकाणी या जोडप्याने मिळून होळी, गुढीपाडवा हे सण साजरे केले होते. सध्या पूजा एकटी मुंबईला परतली आहे. अभिनेत्री तिच्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळतं.

पूजा सावंत लग्नानंतर पहिल्यांदाच कोकणातल्या गावी पोहोचली आहे. यावेळी तिच्याबरोबर तिचा भाऊ श्रेयस, बहीण रुचिरा आणि तिचे वडील देखील कोकण फिरायला गेले आहेत. अभिनेत्रीने कोकणातील निसर्गरम्य वातावरणाचे खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं कोकणातील घर, आजूबाजूचा परिसर, हिरव्यागार आमराईची झलक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video: ‘खतरों के खिलाडी १४’मध्ये शालिन भनोटला २०० हून अधिक विंचवांनी केला दंश! धक्कादायक व्हिडीओ आला समोर

पूजा सावंत इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा : Video: “खल्लास”, अल्लू अर्जुन व रश्मिकाच्या ‘अंगारों’ गाण्यावर गौतमी पाटीलचा जबरदस्त डान्स पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस

दरम्यान, पूजा आणि सिद्धेशचं लग्न हे अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं होतं. अभिनेत्रीचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. अभिनेत्रीने तिच्या आणि सिद्धेशच्या नात्याबद्दल सर्वप्रथम गश्मीर महाजनीची बायको गौरीला सांगितलं होतं. यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबर ( २०२३ ) महिन्यात जोडीदाराबरोबर फोटो शेअर करत पूजाने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. लग्नानंतर सध्या पूजा भारतात तर, सिद्धेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियात आहे.

पूजा सावंतच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री शेवटची ‘मुसाफिरा’ चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिच्याबरोबर पुष्कर जोग, दिशा परदेशी व पुष्कराज यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.