Independence Day 2024 : यंदा ७८वा स्वातंत्र्य दिन देशभरात साजरा होत आहे. शाळा, कॉलेज, विविध सरकारी आणि खासगी ऑफिसांमध्ये ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन आज जल्लोषात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला. देशाला संबोधित करताना मोदींनी आत्मनिर्भर भारत, भ्रष्टाचार, डिजिटल इंडिया अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. सध्या सोशल मीडियावर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. कलाकार मंडळी देखील चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसत आहे. पण काही कलाकारांनी स्वातंत्र्यदिनी देशात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य करत पोस्ट लिहिली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस ( Sameer Vidwans ) यांनी नुकतील मार्मिक पोस्ट लिहित स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे समीर विद्वांस ( Sameer Vidwans ) सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींविषयी आपलं परखड मत व्यक्त करत असतात. आज स्वातंत्र्य दिनी देखील त्यांनी आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. "तरीही! स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!", असं कॅप्शन त्यांनी पोस्टला दिलं आहे. हेही वाचा - Video : ऐश्वर्या नारकरांचा ए. आर. रेहमान यांच्या तमिळ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ समीर विद्वांस ( Sameer Vidwans ) यांनी लिहिलं आहे की, देश म्हणजे फक्त जमीन नाही, देश म्हणजे वेस नाही. देश माणसांनी बनतो, माणूस तत्वांनी बनतो. माणुसकी ही सगळ्याचं मूळ आहे. ती असेल तर जात, धर्म, लिंग, भाषा, वर्ग, वर्ण या सगळ्याला एकसमान दर्जा मिळतो. या सगळ्यासकट देश बनतो. लाल किल्यावरून भाषणं देऊन किंवा सोसायट्यांमधून ध्वजारोहण करून किंवा देशभक्तीची गाणी वाजवून उदात्त वगैरे वाटून घ्यायचं देशप्रेम हे वांझोटं आहे. समाज म्हणून आपण कुठे आहोत तिथे देश आहे. आणि मला माफ करा पण समाज म्हणून आत्ता आपण खूप मागे आहोत. कोणापेक्षा नव्हे तर स्वतः पेक्षा! आपण खरंच खूप बरं जगू शकतो जगू देऊ शकतो! हेही वाचा - “लोकांनी घाबरणं सोडूनच दिलंय”, स्वातंत्र्यदिनी आर्या आंबेकरने मांडलं परखड मत, म्हणाली, “पुण्यातील अपघात, कोलकत्ता डॉक्टर प्रकरण…” समीर विद्वांस ( Sameer Vidwans ) यांच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी त्यांच्या मताला सहमती दर्शवली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी समीर विद्वांस लग्नबंधनात अडकले. अत्यंत साध्या पद्धतीने, रिती-रिवाजानुसार त्यांनी जुईल सोनलकर हिच्याशी लग्नगाठ बांधली. समीर विद्वांस यांच्या लग्नाला मराठी कलाकारांसह बॉलीवूडच्या कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.