आज सगळीकडे गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य जनतेसह मराठी कलाकारही घरी गुढी उभारून हा सण साजरा करत आहेत. अनेक कलाकार त्यांचे फोटो पोस्ट करत शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“चैत्र शुद्ध प्रतिपदा; आजपासून शालिवाहन शके १९४५ शोभन संवत्सरास प्रारंभ होत आहे. तुम्हा सर्वांना मराठी- हिंदू किंबहुना ‘भारतीय’ नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. यंदाचे वर्षी आपलं नव वर्ष आणि भारतीय राष्ट्रीय सौर वर्ष एकाच दिवशी अर्थात आजपासून सुरू होतय. कित्येक वर्षांनी असा योग येतो. त्यामुळे सर्वांना दुहेरी शुभेच्छा,” असं प्राजक्ता म्हणाली.
यावेळी तिने आजच्या जेवणाच्या बेताबद्दलही सांगितलं. “हे झालं संस्कृतीविषयी, तेवढाच रस आपल्याला खाद्य संस्कृतीतही आहे. तर यंदाचं नवं वर्ष शूटिंग सेटवर असताना देखील; श्रीखंड- पुरी, बटाटा भाजी, पापड यावर ताव मारून साजरं करण्यात आलंय. माझ्या आयुष्यात “राम” आहे, तुमच्याही आयूष्यात तो भरून राहो,” असं प्राजक्ताने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.