scorecardresearch

Premium

“तो आमचा पहिला मुलगा…”, प्रार्थना बेहेरेच्या घरातील ‘तो’ खास सदस्य आहे तरी कोण?

“तो आमच्यासाठी खरंच खूप खास…”, प्रार्थना बेहेरेने केला घरातील ‘त्या’ खास सदस्याबाबत खुलासा

prarthana behere reveals about her favourite dog gabbar
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व तिचा नवरा दिग्दर्शक अभिषेक जावकर

‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ अशा अनेक चित्रपटांमुळे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मराठी कलाविश्वात लोकप्रिय झाली. त्यापूर्वी तिने छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरलेल्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केलं होतं. सिनेसृष्टीत अल्पावधीतच प्रार्थनाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. पुढे, २०१७ मध्ये अभिनेत्रीने अभिषेक जावकरशी लग्न केलं. अभिषेक कलाविश्वात लेखक, दिग्दर्शक आणि उत्तम निर्माता म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीच प्रार्थना-अभिषेक मुंबई सोडून अलिबागला स्थायिक झाले.

प्रार्थना-अभिषेकने अलिबागमध्ये एका आलिशान घरात संसार थाटला आहे. अभिनेत्रीने नुकतंच तिचं नवीन युट्यूब चॅनेल सुरू केलं असून यावर प्रार्थनाने तिच्या संपूर्ण घराची झलक दाखवली होती. सध्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून अभिनेत्री दर आठवड्याला व्हिडीओ शेअर करून तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती देत असते. यापूर्वीच्या व्हिडीओमधून प्रार्थनाने अलिबागला स्थायिक होण्याची कारणं, अभिषेक आणि तिचे लग्नाबद्दले विचार या सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिडीओमध्ये प्रार्थनाने अभिषेक व्यतिरिक्त तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीबद्दल सांगितलं आहे.

good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…
youth lured a young woman
नागपूर : प्रेमसंबंध एकीशी अन् लग्न दुसरीशी… हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाच्या हातात बेड्या…
indian folk paintings and folk painter ways to fight colonial legacy
कलाकारण : ‘वसाहतवादाच्या वारशा’शी लढण्याचे मार्ग
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : बुद्धिमत्ता चाचणी तयारी

हेही वाचा : सारा तेंडुलकरची यशस्वी कामगिरी! लंडनमध्ये ‘या’ विषयात पूर्ण केलं मास्टर्स, अंतिम परीक्षेत मिळवले ‘एवढे’ गुण

प्रार्थनाने तिच्या युट्यूब व्हिडीओमध्ये त्यांच्या घरातील गब्बरबद्दल भरभरून सांगितलं आहे. प्रार्थनाच्या घरातील हा खास सदस्य गब्बर नेमका आहे तरी कोण? जाणून घेऊयात…

गब्बर हा प्रार्थना-अभिषेकच्या घरातील सेंट बर्नार्ड जातीचा पाळीव श्वान आहे. त्याच्याबद्दल सांगताना प्रार्थना म्हणाली, “अभीला प्राणी आवडतात हे आधी मला माहिती नव्हतं. त्याला प्राण्यांविषयी खूप प्रेम आहे, हे जेव्हा मला समजलं…तेव्हाचं मी ठरवलं या मुलाशी लग्न केलं पाहिजे. नावाप्रमाणे तो गब्बर जरी असला, तरी तो खरंच खूप जास्त शांत आहे.”

हेही वाचा : राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना यश चोप्रांनी खोलीत केलेलं बंद, अभिनेत्रीसमोर ठेवली होती फक्त एकच अट

prarthana behere
प्रार्थना बेहेरे, अभिषेक जावकर आणि गब्बर

“काही लोकांनी आम्हाला गब्बरला दत्तक घेण्यापूर्वी खूप खर्च होईल वगैरे सांगितलं होतं. कारण, अशाप्रकारच्या श्वानाला विशिष्ट ठिकाणी ठेवावं लागतं, त्यांचं जेवणं वेगळं असतं. त्याप्रमाणे सुरुवातीला तो एसीमध्येच राहायचा. पण, आता असं काहीच नाहीये. तो आमच्या इतर पाळीव प्राण्यांमध्ये मिळून मिसळून राहतो. आता तो सात वर्षांचा झाला आहे. आमच्या घरात कितीही इतर पाळीव प्राणी आले तरीही गब्बरवरचं प्रेम कायम तसंच राहणार…तो आमचा पहिला मुलगा आहे आणि तो आमच्यासाठी खरंच खूप खास आहे.” असं प्रार्थनाने सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prarthana behere reveals about her favourite dog gabbar actress says he is our first boy and always remain special to us sva 00

First published on: 29-11-2023 at 10:58 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×