Prasad Oak New Family Member: आज(१० मे २०२६) जागतिक मातृदिन आहे. या निमित्ताने सर्वजण त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांनी त्यांच्या आईबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो लक्ष वेधून घेत आहेत.
आता या सगळ्यात प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओने लक्ष वेधले आहे. प्रसाद ओकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या घरी नवीन सदस्याचे आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की प्रसाद ओकच्या हातात श्वानाचे छोटेसे पिल्लू आहे. मंजिरी ओक त्याचे औक्षण करत आहेत. तसेच, त्या पिल्लाचा गृहप्रवेश केल्याचे दिसत आहे. त्यानंतर पिल्लाबरोबर प्रसाद व मंजिरी ओक यांचे फोटो पाहायला मिळत आहेत.
या व्हिडीओवर कुटुंबातील नवीन व्यक्ती असे लिहिले आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करत, “अजून एक मुलगी आली हो” लिहिले. तसेच मंजिरी ओक यांना टॅग करत त्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, तिचे नाव काय आहे, याचाही खुलासा केला आहे. अभिनेत्याने लिहिले, “आमच्या या मुलीचं नाव बिस्कॉफ”, असे लिहत नावाचा खुलासा केला.
प्रसाद ओकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “खुप गोड”, दुसऱ्या एकाने लिहिले, “खूप छान”, आणखी एकाने लिहिले, “मस्त”, एकाने लिहिले, “किती छान”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “किती क्यूट. ती खूप नशीबवान आहे की असे प्रेमळ व काळजी घेणारे पालक मिळाले. खरंच तिच्या रूपाने घरात आनंद ,सुख आणि मानसिक शांती समाधान नांदणार आहे”, एकाने लिहिले, “किती क्यूट. अभिनंदन”, आणखी एकाने लिहिले, “लक्ष्मीच्या पावलांनी”, एकाने लिहिले, “किती गोड”, आणखी एकाने लिहिले, “वाह”, एकाने लिहिले, “तुमच्या बाळाला आणि तुम्हाला खूप शुभेच्छा”, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी करत कौतुक केले आहे.
चाहत्यांबरोबरच काही कलाकारांनीदेखील प्रसाद ओकच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. अमृता खानविलकरने लिहिले, “अगं बाई”, तसेच हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. प्रार्थना बेहेरेने लिहिले, “खूप क्यूट आहे.” आश्विनी कासारने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. तर उत्कर्ष शिंदेने लिहिले, “किती क्यूट. हा लहानसा सुंदर जीव तुमच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येऊ दे”, स्वाती चिटणीस यांनी कमेंट करत लिहिले, “किती क्यूट आहे”, स्वप्नील जोशीने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. काजल काटेने लिहिले, “किती गोड आहे”, तर सोनाली खरे यांनी लिहिले की अरे किती गोड आहे, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे.
दरम्यान, प्रसाद ओक व मंजिरी ओक दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. विविध पोस्ट करत ते लक्ष वेधून घेतात.
