Prasad Oak : मराठी मालिकाविश्व आणि सिनेसृष्टीतीतील अनेक कलाकार आपल्या पत्नीसह मजेशीर व्हिडीओ आणि रील्स तयार करत सोशल मीडियावर पोस्ट करतात. चाहतेही आपल्या लाडक्या कलाकारांच्या या व्हिडीओंवर कमेंट करीत त्यांचं कौतुक करतात. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची जोडी डान्सचे अनेक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. प्रसाद ओक व मंजिरी ओकसुद्धाद सोशल मीडियावर रील्स शेअर करतात. ते दोघे मिळून अनेकदा आपल्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकताच प्रसाद ओकने एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रसादने शेअर केलेल्या व्हिडीओत तो त्याची पत्नी मंजिरी ओकला त्याचे मित्र मिळून बँकॉक, फुकेतला जाण्याचा प्लॅन करत असल्याचं सांगतो. आणि तिथे जाण्याची परवानगी मागण्यासाठी येतो. प्रसाद ओकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याची पत्नी पोळ्या लाटून त्या भाजतेय, असं दिसतंय. जेव्हा प्रसाद मंजिरीकडे या ट्रिपची परवानगी मागायला येतो तेव्हा मंजिरी गॅसवर असणारा तवा खाली उतरवून चिमटा गरम करते आणि प्रसादचे ट्रिपविषयीचे सूर बदलतात.

bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Marathi actor Pushkar Jog cryptic post on Instagram
“परमेश्वरा मी थकतोय…”, पुष्कर जोगच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाला, “खूप फसवतात…”
Varsha Usgaonkar And Archana Joglekar
तुमच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्रीला पाहायला आवडेल? वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “तिच्यासारखी दिसणारी…”
Bigg Boss 18 Rupali Bhosle fire on Vivian dsena
Bigg Boss 18: रुपाली भोसले भडकली ‘बिग बॉस १८’मधील ‘या’ सदस्यावर; सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली, “हा अहंकार…”
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”
rajeshwari kharat fandry fame actress shares photo with somnath awaghade
‘फँड्री’तील शालू-जब्या गुपचूप लग्नबंधनात? राजेश्वरी खरातच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, “हे कधी झालं…”

पाहा व्हिडीओ –

[

हेही वाचा…“परमेश्वरा मी थकतोय…”, पुष्कर जोगच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाला, “खूप फसवतात…”

amruta khanvilkar pruthvik pratap comments prasad oak video
प्रसादने फुकेतचा संवाद,असं लिहीत हा व्हिडीओ शेअर केला असून यावर प्रसादचे चाहते आणि अनेक कलाकार कमेंट्स करत आहेत. (Photo Credit – Prasad Oak Instagram)

याच व्हिडीओतील मजेशीर गोष्ट म्हणजे जेव्हा प्रसाद फुकेतला जायचं, असं म्हणतो त्याच वेळी मंजिरी चिमटा गरम करते आणि प्रसाद तिथेच “मी का फुकेतचा तिकडे जाऊ? तिथे जाऊन मित्र काय करतात काय माहीत? मी तर तुझ्याबरोबरच जाईन”, असं म्हणतो. प्रसाद असं म्हणाल्यावर मंजिरी पुन्हा तवा गॅसवर ठेवते. हा संवाद झाल्यानंतर प्रसाद निघून जातो आणि पुन्हा येऊन आपण भिवंडीला जाऊयात का तिथे सोफ्याचे मोठमोठे गोडाउन्स आहेत, असं म्हणतो. त्यावर मंजिरी चेहऱ्यावर रागीट भाव प्रकट करत हातानेच प्रसादला शांत करते आणि प्रसाद घाबरून पळून जातो.

प्रसादने फुकेतचा संवाद,असं लिहीत हा व्हिडीओ शेअर केला असून यावर प्रसादचे चाहते आणि अनेक कलाकार कमेंट्स करत आहेत.
प्रसादने फुकेतचा संवाद, असं लिहीत हा व्हिडीओ शेअर केला असून अभिजीत खांडकेकरने कमेंट केली आहे. (Photo Credit – Prasad Oak Instagram)

हेही वाचा…प्राजक्ता माळीचा देवावर विश्वास आहे का? चाहत्याच्या प्रश्नाचं एका शब्दात दिलं उत्तर, म्हणाली…

प्रसादने फुकेतचा संवाद, असं लिहीत हा व्हिडीओ शेअर केला असून, यावर प्रसादचे चाहते आणि अनेक कलाकार कमेंट्स करत आहेत. अभिजीत खांडकेकरने हा संवाद ‘सोफा’ नसतो, अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर, अमृता खानविलकरने “हा हा हा पण आपण गोव्याला जाऊया मंजी” अशी कमेंट केली आहे. तर, हास्यजत्रेतील पृथ्वीक प्रतापने आपण भिवंडीला जाऊया का, अशी कमेंट करत हसण्याचा इमोजी पाठवला आहे. तर एका चाहतीने “फुकेटचा चटका मिळता मिळता राहिला”, अशी कमेंट केली आहे.