Premium

Video: “जगातलं अंतिम सत्य”; प्रसाद ओक आणि गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

“जगातलं अंतिम सत्य” तुम्हाला माहित नसेल तर प्रसाद ओक आणि गौरव मोरेचा ‘हा’ व्हिडीओ पाहा…

Prasad oak share funny video with Gaurav More
"जगातलं अंतिम सत्य" तुम्हाला माहित नसेल तर प्रसाद ओक आणि गौरव मोरेचा 'हा' व्हिडीओ पाहा…

अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यानं आपल्या अभिनयाबरोबर दिग्दर्शनातूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लवकरच तो ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेबरोबर पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: जेसीबीनं सासरी पोहोचली राखी सावंत; व्हिडीओ पाहून नेटकरी वैतागले, म्हणाले, “कोणीतरी जाऊन तो जेसीबी उलटा करा”

नुकताच प्रसाद ओकनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रसाद गौरव मोरेला “जगातलं अंतिम सत्य” सांगताना दिसत आहे. व्हिडीओत प्रसाद गौरवला विचारतो की, “सांगलीत आलास. ऐवढा मोठा चित्रपट करतोय. कसा, काय अनुभव?” यावर गौरव म्हणतो की, “सर मी काय सांगू…मी या चित्रपटातून इतकं शिकलो ना…मला खूप शिकायला मिळालं. तुम्ही आहात, आजूबाजूला लोकं आहेत. मी खरच खूप शिकलो.”

हेही वाचा – ‘जवान’नंतर आता ‘टायगर ३’चा जलवा; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार दमदार टीझर?

पुढे प्रसाद गौरवला म्हणतो की, “मला अनुभव जास्त आहे म्हणून तुला एक सांगतो. जगातल्या कुठल्याही क्षेत्रात जेव्हा पैसे खूप कमी मिळतात ना तेव्हा माणूस हे वाक्य म्हणतो, खूप शिकायला मिळालं. असं काही नसतं.”

हेही वाचा – “…तर गंभीर परिणाम भोगावे लागतील”; उत्कर्ष शिंदेच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाला…

हेही वाचा – Video: गणपती बाप्पाला २१ मोदकांचा नैवेद्य का दाखवतात? लिटिल चॅम्प्सनं दिलेलं उत्तर ऐकून मृण्मयी देशपांडे झाली थक्क

प्रसाद आणि गौरवच्या या मजेशीर व्हिडीओवर दोघांच्या चाहत्यांनी देखील मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “प्रसाद ओक जळतो तुझ्यावर गौरव भाई.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “म्हणजे इथे रीलवर पण इज्जत काढणार.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “एवढं पण खरं नव्हतं बोलायचं.”

हेही वाचा- Rahul Vaidya And Disha Parmar: लक्ष्मी आली घरी! राहुल वैद्यच्या आई-वडिलांनी नातीचं केलं असं स्वागत; पाहा व्हिडीओ

दरम्यान, प्रसाद आणि गौरवच्या ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाला ‘महापरिनिर्वाण दिन’ असं म्हटलं जातं. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी त्यांचं निर्वाण झालं. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा हा ऐतिहासिक क्षण होता. या क्षणावर आधारित ‘महापरिनिर्वाण’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prasad oak share funny video with gaurav more pps

First published on: 25-09-2023 at 20:07 IST
Next Story
Video : “वाहती नदी, चुलीवरचा भात अन्…”, मराठमोळा अभिनेता पोहोचला कोकणात; म्हणाला, “माझं गाव..”