अभिनेता प्रसाद ओक त्यांच्या उत्तम अभिनयसाठी ओळखला जातो. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला त्याचा 'धर्मवीर' हा चित्रपट प्रचंड गाजला होता आणि त्यातील त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. पण अभिनयाव्यतिरिक्त प्रसाद ओक सोशल मीडियावरही तेवढाच सक्रिय असतो. अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरलही होताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. प्रसादची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. प्रसाद ओकचा सोशल मीडिया बराच मोठा चाहता वर्ग आहे. तो अनेकदा त्याचे कामाचे अपडेट आणि इतर मजेदार व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. आताही त्याने पत्नी मंजिरी ओकबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. या व्हिडीओमधून त्याने मजेदार अंदाजात प्रत्येक नवऱ्याची अवस्था दाखवली आहे. आणखी वाचा- Video: राम चरणसह आनंद महिंद्रांनी केला ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाले… इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये प्रसाद ओक एखाद्या एटीएम मशीनप्रमाणे यंत्रवत हालचाली करताना दिसत आहे.त्याने तोंडात एक कार्ड पकडलं आहे आणि नंतर तो खिशात काही पैशांची रक्कम पत्नीच्या हातात देतो. या व्हिडीओला प्रसादने, "कॅप्शनची गरज नाही" असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर 'प्रत्येक नवऱ्याची अवस्था' असं मजेदार वाक्यही त्याने टाकलं आहे. त्याच्या या मजेदार व्हिडीओवर अनेकांनी धम्माल कमेंट्स केल्या आहेत. आणखी वाचा- “…तेव्हा लोकांना मराठी संस्कृती आठवते” मराठीमधील बोल्ड चित्रपटांबाबत प्रथमेश परबचं भाष्य प्रसाद ओकच्या या व्हिडीओवर कमेंट करताना अभिनेत्री अमृता खानविलकरने लिहिलं, "हाहाहा… अरे काय हे आणि प्रसाद ऐकतोय. व्वा व्वा…" अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि अदिती द्रविड यांनी हसणारे इमोजी पोस्ट करत कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान प्रसाद ओकच्या कामाबद्दल बोलायचं तर आगामी काळात तो 'धर्मवीर २' चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.