Prasad Oak New Car : आपल्याकडे हक्काचं घर आणि फिरण्यासाठी छानशी गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मराठी कलाकारांनी नवीन गाड्या, घरं खरेदी करत आपली स्वप्नपूर्ती केली आहे. आता यात प्रसाद ओकचं नाव जोडलं गेलं आहे. मात्र, प्रसादने स्वत: गाडी खरेदी केली नसून त्याच्या लाडक्या लेकाने अभिनेत्याला ही कार गिफ्ट दिली आहे.

प्रसाद ओकला ( Prasad Oak ) मयंक आणि सार्थक अशी दोन मुलं आहेत. अभिनेत्याला सार्थकने गिफ्ट म्हणून खास BMW कार दिली आहे. नवीन गाडी घरात आल्यावर प्रसादची पत्नी मंजिरी ओकने खास पोस्ट शेअर करत आपल्या दोन्ही मुलांचं कौतुक केलं आहे. या पोस्टबरोबर २२ वर्षांआधीचा फोटो शेअर करत तिने एका जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे. प्रसादची पत्नी पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली आहे जाणून घेऊयात…

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
namrata sambherao dance on kolhapuri halgi with husband
कोल्हापुरी हलगीवर नम्रता संभेरावने पतीसह धरला ठेका! नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आपली संस्कृती…”
Gautam Rode Pankhuri Awasthy break up thoughts
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”
pandharinath kamble daughter grishma supports father and shared angry post on jahnavi killekar
बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”
Hungama 2 actress Pranitha Subhash blessed with baby boy
बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, तीन वर्षांपूर्वी बिझनेसमनशी केलंय लग्न
Dhananjay Powar wife and mother expressed displeasure accusing of Bigg Boss marathi
Video: धनंजय पोवारच्या पत्नी व आईने ‘बिग बॉस’वर आरोप करत व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या, “त्याला दाखवतंच नाहीये काय भानगड…”
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”

हेही वाचा : The Buckingham Murders : लहान मुलाचा खून अन् ५ संशयित! खऱ्या आरोपीला कसं शोधणार करीना कपूर? पाहा ट्रेलर

मंजिरी ओकची पोस्ट

सार्थक जेव्हा गोष्ट तुमच्या बाबतीतली यायची… तेव्हा आपला बाबा तसा थोडा भित्राच होता ( अजूनही आहे ). तुझ्या दुसऱ्या वाढदिवसाला ( म्हणजे ३ सप्टेंबर २००२ ) जरा मी मागे लागले म्हणून बाबाची तयारी नसताना त्यानी तुला ही सायकल सरप्राइज गिफ्ट म्हणून आणली होती पण त्याला काळजी की, तू ती चालवताना पडलास तर? तुला लागलं तर ? म्हणून कित्येक दिवस त्याने तुला ती सायकल घराखाली नेऊ पण दिली नाही . (अर्थात आपण हळूच जायचो तो नसताना )
त्यावर बसायचं कसं हे पण तुला कळत नव्हतं. मात्र, तू बाबाला ती पहिल्यांदा चालवून दाखवल्या नंतरचा जो आनंद तुझ्या चेहऱ्यावर होता अगदी तोच आणि तसाच आनंद ( लहान मुलासारखा ) आज बाबाच्या चेहऱ्यावर आहे.. त्याचं कारण म्हणजे, आज २२ वर्षांनी ( ३ सप्टेंबर २०२४ ) तू बाबाला ही मोठ्ठी गाडी सरप्राइज गिफ्ट दिलीस… मी नको म्हणाले, तर तू म्हणालास की बाबा स्वतःहून कधीच स्वतःसाठी मोठी गाडी घेणार नाही. ( त्या ऐवजी छोटं घर घेऊ असंच म्हणेल ).

माझ्याकडे शब्द नाहीयेत सार्थक… फक्त एवढच सांगते की खूप खूप अभिमान वाटतो तुझा आणि मयंकचा पण…!!!
खूप मोठ्ठा हो
स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
“B”est
“M”any
“W”ishes

हेही वाचा : तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी; अप्पी ऑफएअर होणार?

prasad oak
प्रसाद ओक व मंजिरी ओक ( Prasad Oak )

मंजिरीने शेअर केलेल्या या पोस्टवर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रसाद ओकने ( Prasad Oak ) यावर “थँक्स अ लॉट डिअर सार्थक खूप खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा” अशी कमेंट करत लेकाचे आभार मानले आहेत. अमृता खानविलकर, क्रांती रेडकर, समीर चौघुले, गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप, अमेय वाघ, विकास पाटील, शशांक केतकर, अभिजीत खांडकेकर, ऋजुता देशमुख, भार्गवी चिरमुले अशा असंख्य कलाकारांनी पोस्टवर कमेंट करत प्रसाद व त्याचा मुलगा सार्थक यांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, प्रसादच्या ( Prasad Oak ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर आता लवकरच तो ‘धर्मवीर २’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या २७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.