छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमामधील कलाकारांचा तर मोठा चाहता वर्ग आहे. त्यातील एक कलाकार म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. प्रियदर्शिनी सध्या बरीच चर्चेत आहे. प्रियदर्शिनीची मुख्य भूमिका असलेला ‘फुलराणी’ चित्रपट गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रदर्शित झाला आहे. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

आणखी वाचा – मोठा अपघात, केईएम रुग्णालयामध्ये तीन महिने उपचार अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने सांगितलेला ‘तो’ प्रसंग

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

सुबोध भावेबबरोबर प्रियदर्शिनीने ‘फुलराणी’मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. अनेक कलाकार मंडळींनी तिच्या कामाचं भरभरुन कौतुक केलं आहे. तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी तिच्यासाठी सोशल मीडियाद्वारे खास पोस्टही शेअर केली. आता प्रियदर्शिनीचा चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओकने प्रियदर्शिनीबाबत त्याचं मत व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा – “वडिलांच्या पानाचे पैसे मी दिले अन्…” लंडन दौऱ्यावर निघाला कुशल बद्रिके, भावूक होत म्हणाला, “पानवाल्याने माझा हात…”

प्रसादने त्याची पत्नी मंजिरी ओकसह हा चित्रपट पाहिला. थिएटरमधून बाहेर आल्यानंतर एका युट्यूब चॅननला दिलेल्या मुलाखतीत प्रसादने प्रियदर्शिनीचं कौतुक केलं. तो म्हणाला, “प्रियदर्शिनीने कसं काम केलं आहे हे पाहण्याची मला सर्वात जास्त उत्सुकता होती. गेली तीन ते चार वर्ष मी तिला पाहत आहे”.

आणखी वाचा – Video : निक जोनसवर चाहतीनं फेकलं अंतर्वस्त्र, प्रियांका चोप्रानं असं काही केलं की…; व्हिडीओ व्हायरल

“प्रियदर्शिनी ज्या पद्धतीने तिच्या कामामध्ये सुधारणा करत आहे त्याचा मला आनंद आणि अभिमान आहे. तिला आज मी मोठ्या पडद्यावर पाहिलं आणि तिच्याबाबतचा अभिमान दुप्पट वाढला. तिने खूप कष्ट केले आहेत. एकंदरीतच तिने केलेले कष्ट आणि चित्रपटासाठी घेतलेली मेहनतही दिसते. चित्रपटातील भूमिकेसाठी तिने घेतलेली मेहनत ही क्षणोक्षणी दिसते”. प्रसादला प्रियदर्शिनीचं काम आवडलं असल्याचं त्याच्या बोलण्यामधून दिसून आलं.