‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांचा विवाहसोहळा गेल्या महिन्यात २४ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. जानेवारी महिन्यात केळवणाचा फोटो शेअर करत या दोघांनी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची घोषणा केली होती. प्रथमेश आणि क्षितिजा गेली ३ वर्षे एकत्र आहेत. या जोडप्याच्या लग्नाला सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

थाटामाटात लग्न केल्यावर प्रथमेश आणि क्षितिजाने जोडीने सत्यनारायण पूजा केल्याचं पाहायला मिळालं. महापूजेची खास झलक अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली. या पूजेला संपूर्ण परब कुटुंब एकत्र जमल्याचं पाहायला मिळत आहे. या पूजेसाठी प्रथमेश-क्षितिजाने खास पारंपरिक लूक केला होता. अभिनेत्याने शेवाळी रंगाचा सदरा आणि त्यावर गुलाबी रंगाचा शेला परिधान केला होता. तर, क्षितिजाने नवऱ्याला मॅचिंग अशी डार्क शेवाळी रंगाची साडी नेसली होती. पूजा पार पडल्यावर दोघांनीही या सोहळ्यातील खास क्षण त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक

हेही वाचा : “मी फक्त रडत होते”, ‘सिम्बा’ पाहिल्यावर मराठमोळ्या वैदेही परशुरामीला तब्बूने केलेला फोन, अभिनेत्री म्हणाली…

लग्नानंतर प्रथमेश परबच्या घरी गृहप्रवेश करताना क्षितिजाचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. नव्या सुनेचं औक्षण झाल्यावर तिने माप ओलांडून घरात प्रवेश घेतला. यावेळी क्षितिजाने लाडक्या प्रथमेशसाठी खास उखाणा घेतला होता. यामध्ये अभिनेत्याच्या आजवरच्या प्रत्येक चित्रपटाच्या नावांचा समावेश क्षितिजाने केला होता. सध्या या उखाण्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

हेही वाचा : सुमीत पुसावळेची ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतून एक्झिट; भावुक पोस्ट करत म्हणाला, “जाताना एवढंच म्हणेन…”

दरम्यान, प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख सोशल मीडियावर झाली होती. यानंतर दोघेही एका कॅफेमध्ये प्रत्यक्ष भेटले. दोघांमध्ये मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. १४ फेब्रुवारीला साखरपुडा केल्यावर २४ तारखेला हे दोघेही विवाहबंधनात अडकले.