मराठीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब सध्या खूपच चर्चेत आहे. १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याचा सारखपुडा पार पडला. या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता २४ फेब्रुवारीला प्रथमेश त्याची प्रेयसी क्षितिजा घोसळकर हिच्याबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.

प्रथमेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ तो चाहत्यांबरोबर शेअर करीत असतो. दरम्यान, प्रथमेशच्या नव्या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच प्रथमेश व क्षितिजाने प्री-वेडिंग फोटोशूट केले. कोकणात श्रीवर्धन येथे समुद्रकिनाऱ्याजवळ दोघांनी फोटोशूट केले. यावेळी दोघांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा कुर्ता वा पायजमा घातला होता; तर क्षितिजाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. त्याबरोबर तिने केसांत गुलाबाचे फूलही माळले होते. या लूकमध्ये दोघे खूपच सुंदर दिसत होते.

प्रथमेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या फोटोशूटचे काही निवडक फोटो शेअर केले आहेत. प्रथमेशचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. प्रथमेशच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. टाइमपास या चित्रपटात त्याने साकारलेली दगडू ही भूमिका खूपच गाजली. खऱ्या आयुष्यातही अनेक लोक त्याला दगडू म्हणूनच ओळखतात. त्यानंतर ‘बालक-पालक’, ‘दृश्यम’, ‘ताजा खबर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

हेही वाचा- प्रसाद ओक याला वाढदिवसानिमित्त अमृता खानविलकरने दिले ‘हे’ महागडे गिफ्ट, फोटो शेअर करत म्हणाला…

प्रथमेश व क्षितिजाची इन्स्टाग्रामवर पहिल्यांदा ओळख झाली. १४ फेब्रुवारी २०२० ला क्षितिजाने व्हॅलेंटाईन डेनिमित्त एक फोटोशूटची सीरिज केली होती. ही सीरिज बघून प्रथमेशने क्षितिजाला पहिल्यांदा मेसेज केला होता. त्यानंतर हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आता दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.