Kshitija Ghosalkar on Prathamesh Parab: घरात एकमेकांना कामात मदत केली की कोणा एकावर कामाचा ताण पडत नाही, तसेच नाती घट्टही होतात. अनेकदा व्यक्तीमधील रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅगबद्दल बोलले जाते. आता अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितिजाने व्हिडीओ शेअर करत प्रथमेश ग्रीन फ्लॅग आहे की रेड फ्लॅग आहे याबद्दल सांगितले. क्षितिजा नेमकं काय म्हणाली हे जाणून घेऊ…

क्षितिजा सोशल मीडियावर सक्रिय असते. ५० हजारांहून जास्त तिचे फॉलोअर्स आहेत. ती विविध गोष्टी, अनुभव, फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या व्हिडीओंना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसते.

प्रथमेश परब रेड फ्लॅग आहे की ग्रीन फ्लॅग?

नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये क्षितिजाने प्रथमेशबद्दल एक गोष्ट सांगितली. ती म्हणाली, “काल मी ऑफिसमधून आल्यानंतर खूप दमले होते. ऑफिसला नेलेले डबे मी स्वच्छ न करता तसेच ठेवले. उघडले नाहीत, घासले नाहीत, काही केलं नाही, त्यानंतर मी झोपून गेले. सकाळी उठल्यानंतर मला हे टेन्शन होतं की आता आधी डबे घासायला लागणार आहेत, मग ते भरून ऑफिसला नेता येतील.”

“माझ्या चाणाक्ष नवऱ्याने…”

पुढे ती म्हणाली, “आवरून मी किचनमध्ये आले तर मला स्वच्छ केलेले डबे दिसले. माझ्या चाणाक्ष नवऱ्याने ते घासून, पुसून असे व्यवस्थित स्वच्छ करून ठेवले आहेत. माझा नवरा मला एकदम योग्य वेळी मदत करतो.” व्हिडीओच्या शेवटी तिने प्रथमेशला थँक्यू म्हणत त्याचे आभार मानले आहेत.

तसेच हा व्हिडीओ शेअर करत तिने प्रथमेश परबला टॅग करत लिहिले, “तू सगळं ग्रीन फॉरेस्ट आहेस.” क्षितिजाच्या या व्हिडीओवर प्रथमेशने कमेंट केली आहे; तर नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. एकाने लिहिले, “खूप छान”, दुसऱ्या एकाने लिहिले, “खूप छान प्रथमेश”, आणखी एकाने लिहिले, “मस्तच”, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत, तर इतर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

क्षितिजा व प्रथमेशची जोडी कायमच लक्ष वेधून घेत असते. त्यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली. प्रथमेश विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता आगामी काळात तो कोणत्या सिनेमात दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.