‘टाईमपास’ चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरांत लोकप्रिय झाला. फेब्रुवारी महिन्यात २४ फेब्रुवारीला त्याने क्षितिजा घोसाळकरसह लग्नगाठ बांधली. या जोडप्याच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी खास उपस्थिती लावली होती. नुकताच अभिनेत्याने त्याच्या लग्नसोहळ्याचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रथमेश आणि क्षितिजा गेली ३ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. २०२४ च्या जानेवारी महिन्यात केळवणाचा फोटो शेअर करत त्यांनी लग्नाची तारीख जाहीर केली होती. यानंतर १४ फेब्रुवारीला साखरपुडा आणि त्यानंतर २४ फेब्रुवारीला प्रथमेश-क्षितिजाचं लग्न थाटामाटात पार पडलं.

Marathi Singer Juilee Joglekar answer to troller
“दाताडी” म्हणणाऱ्याला गायिका जुईली जोगळेकरने सुनावलं, म्हणाली, “स्वतःचं थोबाड…”
Murlidhar Mohol - Ravindra Dhangeka
Pune Accident : “दोन उद्ध्वस्त कुटुंबांचे अश्रू पुसायचे सोडून बिल्डरची बाजू घेताय?” धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांना टोला
tharala tar mag fame Amit Bhanushali make funny video with wife
Video: ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा बायकोबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “अरेरे बिचारा…”
bigg boss marathi actor Abhijeet Kelkar share village house video
कौलारू घर, अंगण अन्…; ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याच्या कोकणातील सुंदर घराच्या व्हिडीओने सगळ्यांचं वेधलं लक्ष
Police Commissioner Amitesh Kumar porsche car crash
Pune Car Crash : अल्पवयीन नव्हे, आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवणार? आयुक्तांनी सांगितलं पोलिसांचं पुढचं नियोजन
tharala tar mag serial mahasaptah arjun sayali finds big evidence
ठरलं तर मग : अर्जुनच्या हाती लागला मोठा पुरावा, साक्षीचा डाव फसणार? सुरू होतोय मालिकेचा महासप्ताह, पाहा प्रोमो
Aneesh Awdiha
Pune Porsche Accident: “माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या त्या मुलाला…”, अनिशच्या आईची संतप्त प्रतिक्रिया
tharala tar mag fame actress jui gadkari
“मालिकेत सायलीला रडवणारी साक्षी…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

हेही वाचा : Video : “इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही”, संकर्षण कऱ्हाडेची राजकीय परिस्थितीवर कविता; म्हणाला…

प्रथमेशने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लग्नाचा मुहूर्त, वरमाला, सप्तपदी, कन्यादान या सगळ्या विधींची झलक पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला प्रथमेशचा भाऊ सांगतो, “१२ वाजून ५२ मिनिटांचा मुहूर्त आहे. आधी दादाने आम्हाला काहीच सांगितलं नव्हतं आम्हाला नंतर त्याने सांगितलं. पण, मला अंदाज होता कारण, तो सोशल मीडियावर नेहमी क्षितिजाबरोबरचे फोटो शेअर करायचा. पुढे, एकदा मी दादाला विचारलं…नक्की लग्नाचं प्रेम आहे ना? त्यावर दादाने हो नक्की लग्न करणार असं सांगितलं होतं.”

हेही वाचा : “एका असामान्य परिवाराकडून…”, पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, प्रथमेश परबच्या व्हिडीओवर सध्या नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. त्याच्या लग्नात सगळे विधी पारंपरिक पद्धतीने पार पडले. व्हिडीओमध्ये अभिनेत्याचं लग्न साध्या अन् सुंदर पद्धतीने पार पडल्याचं पाहायला मिळत आहे. प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख सोशल मीडियावर झाली होती. यानंतर दोघेही एका कॅफेमध्ये प्रत्यक्ष भेटले. दोघांमध्ये मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या जोडीने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.